file phote 
विदर्भ

पोतदारांना उद्‌घाटनाचे अधिकार कोणी दिले?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : डॉ. राजीव पोतदार लोकप्रतिनिधी नाही व कुठल्याही शासकीय कमिटीचे सदस्य नाही. त्यांना ग्रामपंचायतच्या कार्यक्रमात स्टारबसच्या उद्‌घाटनाचे अधिकार कोणी दिले, असा सवाल सिल्लेवाड्याच्या सरपंच प्रमिला बागडे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यांनी भाजप आमच्या पाठपुराव्याचे श्रेय लाटत असल्याचाही आरोप केला. स्टारबसच्या उद्‌घाटनावरून भाजप आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. याच कार्यक्रमात सुनील केदार यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना झोडपून काढण्याचे आदेश दिल्याने वादंग निर्माण झाले आहे. यास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपतर्फे घरोघरी भाजपचे झेंडे लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी सरपंच बागडे यांनी पत्रकार परिषद घेतली. गुरुवारी सकाळी अकराला स्टारबसच्या शुभारंभाचा कार्यक्रम आमदार सुनील केदार यांच्या हस्ते आयोजित केला होता. भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी सकाळी दहाला कार्यकर्त्यांसह येऊन ग्रामपंचायतीची कुठलीही परवानगी न घेता कार्यक्रम सुरू केला. गावाच्या प्रथम नागरिकांना बोलावण्याचे सौजन्य त्यांनी दाखवले नाही. कार्यक्रमाची पत्रिकाही छापली. त्यामध्येही सरपंचांच्या नावाचा उल्लेख नव्हता. आमदार सुनील केदार नियोजित वेळेवर आले. तेव्हा त्यांनी पदाधिकारी आणि महिलांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांना सुनावले. "घरात घुसून मारू', याचा भोबाटा करून आमदारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असे बागडे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रकाश वसू, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष तक्षशीला वागधरे, वलनीचे सरपंच लईक अन्सारी, पोटा-चनकापूरच्या सरपंच वंदना ढगे, चिचोलीचे सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, भानेगावचे सरपंच रवींद्र चिखले, वंदना बेले यांच्यासह जिल्हा कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढणारं २० वर्षे जुनं प्रकरण काय? PWD कनेक्शन नेमकं काय?

सिल्लोड-जळगाव महामार्गावर भीषण अपघात; पालोद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत १५ वर्षीय बालकाचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : धुळ्यात महसूलमंत्री बावनकुळेंनी अधिकाऱ्याची शेतातच घेतली ‘शाळा’

Noida Crime : सातव्या महिन्यातच मुलाचा जन्म, उपचारासाठी खर्च झाले ४० लाख; इंजिनिअरने कर्ज, तवाणावातून ४३ व्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले

Pitru Paksha 2026: सर्वपित्री अमावस्येला नवरात्रीच्या पूजेचे सामान खरेदी करावे की नाही? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT