संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

राष्ट्रीय महामार्गाची जबाबदारी कोणाकडे?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? अशी परखड विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र सरकारला केली आहे. त्यावर, एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. ऍड. अरुण पाटील यांनी अमरावती ते धुळे आणि वर्धा ते सिंदखेडराजा या महामार्गाच्या कामात झालेल्या दिरंगाईबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली.
याचिकाकर्त्यांनुसार, अमरावती ते अकोला हा मार्ग अत्यंत धोकादायक झालेला आहे. या मार्गाचे बांधकाम गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. या मार्गाचे कंत्राट ऍफकॉन कंपनीला देण्यात आले होते. मात्र, कंत्राटदार कंपनी दिवाळखोर झाली असल्याने बांधकाम रखडले आहे. या रस्त्यावर गेल्या काही महिन्यात भीषण अपघात झाले असून त्यात अनेकांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे सदर मार्ग तातडीने बांधण्याचे आदेश द्यावेत, अशी याचिकेत विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वर्धा ते सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्गदेखील रखडला आहे. विदर्भातील महत्त्वाच्या स्थानांवरून जाणारा हा महामार्ग तातडीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, असे याचिकेत नमूद केले आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखल केलेल्या शपथपत्रात वर्धा ते सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग नसल्याचा दावा केला. तसेच त्या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी प्राधिकरणाकडे दिलेली नाही, असेही नमूद करण्यात आले. राज्य सरकारने सदर दावा खोडून काढला. केंद्र सरकारच्याच अधिसूचनेनुसार वर्धा, पुलगाव येथून सिंदखेडकडे जाणारा मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग घोषित केलेला आहे, असे नमूद करण्यात आले. तेव्हा या मार्गाची जबाबदारी ही केंद्र सरकारचीच आहे, असा दावाही राज्य सरकारकडून करण्यात आला. तेव्हा उच्च न्यायालयाने वर्धा ते सिंदखेडराजा हा मार्ग कोणाकडे आहे, त्यावर केंद्र सरकरकडे एका आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली.
कामाच्या दर्जावर शंका
वर्धा ते सिंदखेडराजा या मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे उच्च न्यायालयामध्ये मांडण्यात आले. मात्र, या पूर्ण झालेल्या कामाच्या दर्जावर उच्च न्यायालयाने संशय व्यक्त केला. कंत्राटदार कंपनीला दिलेल्या रकमेबाबत आणि काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तसेच, उर्वरित 30 टक्के काम ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT