संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

अमरावती शहरात कुणाच्या अनुमतीने रात्रीपर्यंत उघडे असतात हॉटेल?

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील इतर व्यापारी आस्थापनांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनुमती असताना, काही हॉटेल कुणाच्या अनुमतीने रात्रीपर्यंत उघडे असतात, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


या हॉटेल्सला विशेष परवानगी देण्यात आली आहे काय, असा प्रश्न आता अनेक जण विचारू लागले आहे. सरोज चौकातील कांतिभूवन व मुरली मनोहर हॉटेल रात्री दहावाजेपर्यंत कुणाच्या परवानगीने उघडी ठेवल्या जातात, हा प्रश्‍न उभा ठाकला आहे.
सरोज चौकात शनिवारी (ता. 13) रात्री साडेदहाच्या सुमारास कांतिभूवन हॉटेलचे मालक संजय शर्मा यांच्यावर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न झाला. तर, त्यांच्या मुलावरही हल्लेखोराने बंदूक रोखली. पार्सल घेण्यासाठी आलेल्या युवकाने मालकाशी वाद घालून हल्ला केला होता. त्यात हल्लेखोरास अटकही झाली होती. जखमी संजय शर्मा यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरोज चौकातच रस्त्याच्या दोन्ही बाजूने शर्मा यांचे मुरली मनोहर व कांतिभूवन हे दोन हॉटेल आहेत. रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास हा हल्ला झाला. म्हणजे त्या दिवसापर्यंत शर्मा यांचे दोन्ही हॉटेल रात्रीपर्यंत सुरू होते. त्यानंतर शहर कोतवाली पोलिसांनी शर्माविरुद्ध नियमभंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. याहल्ल्यात आतापर्यंत एकाच हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे.

रात्री उशिरा कोण नेतात फुकट पार्सल?

सरोज चौकातील या दोन्ही हॉटेलसमोर रात्री उशिरापर्यंत बरीच मोठी वाहने नेहमीच उभी राहतात. बऱ्याच जणांचे पार्सल येथून नेण्यात येतात. त्यापैकी कुणी पैसे मोजतात. तर, बरेच जण फुकट पार्सल नेणारेही असतात. ते कोण आहेत याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT