file photo 
विदर्भ

बेवारस मृतदेहांवर तो का करतो अंत्यसंस्कार...वाचा 

सुधीर भारती

अमरावती : एकीकडे समाजातील, कुटुंबातील जिवंत माणसांमधील नातेसंबंधांची वीण सैल होत असताना मृत पावलेल्या लोकांकडे पाहण्यासाठीसुद्धा कुणाकडे फारसा वेळ नसतो. बेवारस असलेल्यांचे तर हालच आहेत. अशाही स्थितीत बेवारस मृतदेहांवर एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे ध्येय बाळगणारा एक युवक मागील 15 वर्षांपासून अव्याहतपणे निःस्वार्थपणे प्रसिद्धीपासून दूर राहून कार्य करीत आहे. महेश साहू असे त्या युवकाचे नाव. 

आणि अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली 
समाजात राहून अनेकजण विविध मार्गानी जमेल त्या पद्धतीने समाजसेवा करणारे अनेक समाजसेवक आज आपण पाहतो. कुणी रक्तदानाच्या क्षेत्रात तर कुणी देहदानाच्या क्षेत्रात काम करीत आहेत. अंबापेठ येथील महेश साहू यांनी मात्र वेगळाच मार्ग निवडला. 15 वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. रायली प्लॉट परिसरातील रेल्वे पुलाखाली एक भिक्षेकरी रोज त्यांना दिसायचा. अनेकदा ते त्याला पैसेसुद्धा द्यायचे. एकेदिवशी त्या भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला आणि त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले. तीन दिवस झाल्यानंतरही कुणीच त्याच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाही. तेथील एका परिचिताने महेश साहू यांना ही बाब सांगितली, तेव्हा साहू यांनी स्वतः त्याच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून महेश साहू यांनी बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. यासाठी त्यांनी शवागारातील कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून माहिती देण्यासही सांगितले. 

काही मित्र जोडले या उपक्रमात 
त्यानुसार एखादा बेवारस मृतदेह आल्यानंतर आवश्‍यकतेनुसार शव विच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर महेश साहू यांना फोन जातो आणि ते कापड व अन्य साहित्य घेऊन शवागारासमोर पोहोचतात. विशेष म्हणजे महेश साहू यांच्यासह त्यांचे काही मित्रसुद्धा या उपक्रमात जोडले गेले आहेत. साहू यांना वेळ नसेल तर त्यांच्या मित्रांपैकी एकजण अंत्यसंस्काराचे साहित्य घेऊन हिंदू स्मशानभूमीत दाखल होतात आणि तेथे अंत्यसंस्काराचे सोपस्कार पार पाडतात. आजपावेतो जवळपास 75 बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार त्यांनी केले आहेत. 

मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करताना तो केवळ एक माणूस आहे हेच डोळ्यासमोर ठेवून मी हे कार्य करीत आहे. कुठेही जात धर्म पाहिला नाही. बेवारसांवरसुद्धा अंत्यसंस्कार झाले पाहिजे. या भावनेतून आपण हे कार्य करीत आहे. 
- महेश साहू, अमरावती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT