soyabean 
विदर्भ

का गडगडले सोयाबीनचे भाव? कुठे चुकला बळीराजा?

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : खरीप हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांना नगदी पैसे मिळवून देणाऱ्या सोयाबीनचे भाव या आठवड्यात चांगलेच घसरले. चार हजार रुपये क्विंटलवर गेलेले सोयाबीनचे भाव तब्बल दोनशे रुपयांनी गडगडले. तसेच सोयाबीनची बाजारातील आवकही मोठ्या प्रमाणात मंदावली असून शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपत आल्याचे हे चिन्ह असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. 

चांगल्या भावामुळे शेतकरी होते खूष

यंदा पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनचे सरासरी उत्पादन घटले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी प्रारंभापासूनच जास्त भावाने सोयाबीन खरेदीचा सपाटा लावला होता. खुल्या बाजारातील भाव शासनाच्या हमीभावापेक्षा अधिक मिळाल्याने शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराकडे धाव घेत आपल्याकडील सोयाबीन विकण्याला सुरुवात केली. त्यामुळे आपसुकच शासकीय खरेदीकडे पाठ फिरवली गेली. मात्र, आता खुल्या बाजारातील भाव पडू लागल्याने शेतकऱ्यांना पुन्हा शासकीय हमीभावाने सोयाबीन विकण्याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शासनाने 3,710 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी चार हजार रुपयांपेक्षा अधिक भाव दिल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवली होती. हंगामात सोयाबीनचे भाव 4300 रुपये प्रति क्विंटलवर गेले होते. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची खरेदी जोमाने झाली. त्याच पाठोपाठ हलक्‍या व दुय्यम प्रतीच्या सोयाबीनलाही यावेळी खुल्या बाजारात 3200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. या दोन्ही प्रतीच्या सोयाबीनमध्ये आता घसरण झाली आहे. शनिवारी (ता.18) येथील बाजार समितीत सोयाबीनला 3,930 ते 3,960 रुपये भाव मिळाला व 2 हजार 832 पोत्यांची आवक नोंदली गेली. हमीदराच्या तुलनेत हे भाव अजूनही 260 रुपयांनी अधिक असल्याने शासनाच्या खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाऊले अद्याप वळलेली नाही. 

अनिश्‍चितता कायम

चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला बराच काळ चार हजारांवर भाव मिळाला. यंदा तुलनेने कमी आवक झाली. आताही आवक मंदावली आहे. मात्र, भाव का कमी झालेत याचा अंदाज येऊ शकला नाही. आगामी काळात ते चढतील की नाही हे सध्यातरी सांगता येत नसल्याचे बाजार समितीमधील अडते राजेश पाटील यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

MI vs KKR Toss Fixing? मुंबई इंडियन्सवर 'फिक्सिंग'चा आरोप, टॉसच्या वेळी हार्दिकने काय केले पाहा; नेटकऱ्यांनी घेतली शाळा Video Viral

खरातचा सीए माफीचा साक्षीदार बनणार? खरातविरोधातच दिलीय तक्रार, शेकडो कोटी परदेशात पाठवले, कोण आहे ललित पोफळे?

Pune Palkhi halt change: पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम बदलण्याचा विचार; अंतिम निर्णय १३ एप्रिलला जाहीर होणार

Mohol Teachers Felicitation: मोहोळ तालुक्यातील १९ शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; उद्या श्रीक्षेत्र वडवळ येथे मान्यवरांच्या हस्ते वितरण

SCROLL FOR NEXT