fighting couple 
विदर्भ

..आणि पत्नीने पतीला लाकडी दांड्याने बदड बदड बदडले!

प्रमोद काकडे

चंद्रपूर : नवरा-बायको आणि वाद हे समीकरणच आहे. या वादातून नवर्याने बायकोला मारण्याच्या घटनाही आपण ऐकतो. मात्र बायकोने नवर्याला बदडल्याची घटना नुकतीच घडली.

मजुरीच्या कामासाठी जाताना पत्नीने जेवणाचा डबा दिला नाही. दिवसभर उपाशीपोटी राबराब राबून रात्री पती घरी परतला. मात्र, रात्रीचाही स्वयंपाक पत्नीने केला नव्हता. त्यामुळे पतीने स्वयंपाक न करण्याचे कारण पत्नीला विचारले. यामुळे संतापलेल्या पत्नीने फावड्याच्या लाकडी दांड्याने पतीला मारहाण केली.

यात गंभीररीत्या जखमी झालेल्या पतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेवणाचा वाद पत्नीने दिलेल्या मारहाणीच्या प्रसादाने मिटल्याची घटना येथील बागला चौकातील महावीरनगरात घडली.

येथील भिवापूर वॉर्डातील बागला चौक परिसरातील महावीरनगरात सुरेश शिवाजी अंकुशे (वय २९) हे पत्नी शारदा हिच्यासोबत राहतात. मोलमजुरी करून ते स्वत:चा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. ५ ऑगस्टला नेहमीप्रमाणे सकाळी सुरेशने मजुरीच्या कामाला जाण्यासाठी तयारी केली. मात्र, पत्नी शारदाने दुपारच्या जेवणाचा डबा तयार करून दिला नाही. त्यामुळे ते डबा न घेताच कामावर गेले. दिवसभर उपाशीपोटी काम करून ते रात्री ८ वाजताच्या सुमारास घरी परतले. परंतु, पत्नीने रात्रीचासुद्धा स्वयंपाक केलेला नव्हता. यामुळे सुरेशने पत्नी शारदाला स्वयंपाक न करण्याचे कारण विचारले. यातून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

सविस्तर वाचा - क्या बात है ! -वर्ध्याच्या ऑरगॅनिक मास्कला इंग्लंडमध्ये पसंती

संतापलेल्या शारदाने फावड्याच्या लाकडी दांड्याने सुरेशला मारहाण करणे सुरू केले. या मारहाणीत सुरेशच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याने शहर पोलिस ठाणे गाठून पत्नी शारदा हिच्याविरुद्ध तोंडी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि पत्नीविरुद्ध भांदवी ३२४, ५०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT