Wife end her life as husband denied to buy new mobile in chandrapur  
विदर्भ

मोबाईलसाठी दिला जीव! पतीने हट्ट न पुरविल्याने पत्नीची आत्महत्या; मुलं झालीत पोरकी 

मनोज कनकम

घुग्घूस(चंद्रपूर) : सध्या स्मार्टफोनचे फॅड आहे. प्रत्येकांकडे काहीही नसो पण स्मार्टफोन असो,अशी इच्छा असतेच. स्मार्टफोन मिळविण्यासाठी  प्रत्येकजण उत्सुक असतो, परंतु फोन घेण्याची इच्छा जर पूर्ण झाली नाही तर कुणीही आपला जिव देईलअशी कल्पना करता येईल का? नाही.  घुग्घूस शहरात हिमाचल लाईन शास्त्रीनगरात एका विवाहितेने पतीने मोबाईलचा हट्ट पुरविला नाही म्हणून गळफास घेवून आत्महत्या केल्याची हद्रयद्रावक घटना आज मंगळवारी 16 मार्च ला उघडकीस आली आहे. 

लक्ष्मी सुरेश कुम्मरी  असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिला असलेल्या 8 महिन्याच्या व 2 वर्षाचे दोन्ही मुले मातृत्वापासून पोरकेझाले आहेत. घुग्घूस शहरातील हिमाचल लाईन शास्त्रीनगर  परिसरात सुरेश कुम्मरी हे राहतात. त्यांचा पेंटिंगचा काम आहे. त्याच कामाच्या भरवश्यावर पत्नी लक्ष्मी, 8 महिणे आणि 2 वर्षाचा असे दोन मुलांचे पालनपोषण करीत आहेत. त्यांच्या मिळकतीवरच संसाराचा गाडा आणि परिवाराच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करीत आहेत. 

दरम्यान पत्नी लक्ष्मीने काही दिवसांपासून पतीकडे आपल्याला मोबाईल घेऊन देण्याबाबत हट्ट धरला होता. परंतु सध्या पतीकडे पैसे नसल्याने त्याने पत्नीला थांबण्यास सांगितले होते. मात्र ती मोबाईलचा हट्ट बाळगून असल्याने शेवटे दोन दिवस थांबण्यास सांगितले होते. दरम्यान आज पतीने तिला मोबाईल घेऊन देण्यासाठी तयार केली होती. परंतु आज मोबाईल घेण्यापूर्वीच पत्नीने आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घरीच गळफास घेवून आत्महत्या केली. पती घरी आल्यानंतर घटना त्याच्या लक्षात आली. लगेच त्यांनी पोलिसांनी  माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतला. 

दरम्यान पोलिसांनी सदर आत्महत्येबाबत चौकशी सुरू केली असता, धक्कादायक कारण पुढे आले. पतीने आपल्या बयानात मोबाईलसाठी पत्नीचा अट्टाहास होता. परंतु मोबाईल घेण्यासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने वेळेवर घेऊन देता आले नाही. मात्र आज मंगळवारीच आपण तिला मोबाईल घेऊन देण्याची व्यवस्था केली होती. आपल्या कामाचे पैसे घेऊन आलो होतो, परंतु त्या अगोदरच तिने घरीच स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची कबुली पोलिसांत दिली आहे. 

विवाहितेच्या पश्चात 8 महिन्याचा तान्हुला आणि 2 वर्षाचा मुलगा आहे. मात्र आईच्या चुकीच्या निर्णयामुळे दोन्ही बाळ आता मातृत्वापासून पोरके झाले आहे. पत्नीने अनाठायी कारणासाठी अट्टाहास करून  पती व चिमुकल्यांना सोडून जिवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यकत् केल्या जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inside Story Maharashtra Farmers : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची बंद दाराआड काय घडली चर्चा, राजू शेट्टींनी सांगितली इनसाईड स्टोरी...

Suhas Shetty Case : बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येमागे PFI चा कट उघड, NIA चा धक्कादायक अहवाल, 11 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

Latest Marathi News Live Update : खोट्या मतदार यादीविरोधात ठाकरे गटाचा उद्या मुंबईत मोर्चा

Bhandara Heavy Rain: भंडारा जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार; खरीप हंगामातील धान पिकाची राखरांगोळी, नुकसानीमुळे बळीराजा संकटात

Kolhapur MPSC Student : एमपीएससीत कोल्हापूरचा डंका! कसबा बावड्याची सायली राज्यात दुसरी, इचलकरंजीचा तन्मय सातवा

SCROLL FOR NEXT