crime 
विदर्भ

नवऱ्याच्या डोक्‍यात दगडी पाटा घालून बायकोनेच धाडले त्याला यमसदनी

सकाळ वृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : नवरा रोज दारू पिऊन यायचा. बायकोला शिवीगाळ करायचा, मारहाण रोजचीच. एक दिवस तिच्या सहनशक्‍तीचा अंत झाला आणि तिने स्वत:च्याच नवऱ्याच्या डोक्‍यात पहाटेच्या वेळी घरातला दगडी पाटा घालून त्याचा खून केला आणि तिच्या रोजच्या वेदनांचा अंत झाला. एखाद्या चित्रपटात शोभावी, अशी ही कहाणी, यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी गावात प्रत्यक्ष घडली.
रोज संध्याकाळी घरी दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीच्या डोक्‍यात दगडी पाटा घालून पत्नीने त्याचा खून केला. ही घटना मंगळवारी (ता.2) पहाटे दोन वाजताच्या सुमारास तालुक्‍यातील जवळा येथे घडली. याबाबत आर्णी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे.
राजेंद्र शालिकराम चुटे (वय 53, रा. गुरुदेवनगर, जवळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नेहमीप्रमाणे सोमवारीही राजेंद्र हा दारू पिऊन घरात आला व पत्नीला शिवीगाळ करायला लागला. रात्री दहाच्या सुमारास तो घरातच दारू पित असताना पत्नीशी भांडण झाले. रात्री उशिरापर्यंत भांडण सुरू होते. रोजच्या या कटकटीला कंटाळलेल्या पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने नवरा झोपेत असताना त्याच्या डोक्‍यात दगडी पाटा घालून त्याचा खून केला. याबाबत आर्णी पोलिस ठाण्यातील हवालदार अरुण चव्हाण यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यावरून संशयित संगीता राजेंद्र चुटे (वय 40) हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच दारव्हा उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंग चंदेल, ठाणेदार यशवंत बाविस्कर यांनी भेट घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले, जमादार अरुण चव्हाण, पुरुषोत्तम जाधव, देवानंद मुनेश्वर, सुधीर कांबळे यांनी पंचमाना केला. आर्णी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबतचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT