nilesh e sakal
विदर्भ

सुखी संसारात अनैतिक संबंधाचं विरजण, पत्नीनं केली पतीची हत्या

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : रासा येथील 30 वर्षीय निलेश सुधाकर चौधरी याचा मृतदेह 29 ऑगस्टला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाला होता. तब्बल 15 दिवसानंतर एक-एक रहस्याचा उलगडा करत पोलिसांनी (wani police yavatmal) आरोपींना जाळ्यात ओढले. मात्र, पत्नीनेच 'निलेश' च्या हत्येची (yavatmal crime) मास्टरमाइंड असल्याचे तपासात उघड झाली. आज 18 सप्टेंबरला मृतकाच्या पत्नीला ताब्यात घेत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मृतक 'निलेश'चे लग्न मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे वास्तव्यास असलेल्या एका मुलीसोबत झाले होते. दोघांचा सुखी संसार सुरू असताना अनैतिकतेचे ग्रहण लागले. निलेशच्या पत्नीचे सूत मृतकाचा मेहुणा चंद्रशेखर दुर्गेसोबत जुळले. जवळचा नातेवाईक असल्याने त्याचा घरातील वावर कोणालाही संशयास्पद वाटत नव्हता. परंतु, अनैतिक संबंधाची कुणकुण कधीतरी लागतेच आणि तसेच घडले. निलेशला अनैतिक संबंधांबाबत कळताच तो प्रचंड हादरला. घटनेच्या 5 दिवसापूर्वी त्याचा पत्नीसोबत चांगलाच वाद झाला आणि तिला माहेरी नरसाळा येथे पाठवून दिले. या घडलेल्या घटनेमुळे सपना कमालीची संतापली आणि प्रियकराच्या मदतीने निलेश चा कायमचा काटा काढण्याचे ठरवले.

घटनेला आयाम देण्यासाठी चंद्रशेखर याने गावातीलच आशिष पिदूरकर, योगेश उघडे, गौरव दोरखंडे व एका विधी संघर्ष बालकाला आपल्या कटात सामील करून घेतले. अतिशय थंड डोक्याने हत्येची योजना आखली. घटनेच्या दिवशी निलेशला दारू पाजण्यात आली आणि त्या चौघांनी त्याचा करकचून गळा आवळला. लगतच असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचा बनाव रचला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे हत्येच्या दिशेने तपासाची रणनीती आखली. ठाणेदार शाम सोनटक्के व तपास अधिकारी आनंद पिंगळे व सहकाऱ्यांनी दि. 16 सप्टेंबर ला 4 आरोपींना ताब्यात घेतले. 2 दिवसाच्या पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांना पत्नीच मास्टरमाइंड असल्याचे उघड झाल्याने शनिवारी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT