husband wife disputes  sakal
विदर्भ

तिवसा : दारूच्या त्रासाला कंटाळून पत्नीने केली पतीची हत्या..

मोझरी येथील घटना..

प्रशिक मकेश्वर.

तिवसा : सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीला बांधून मारहाण करत दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना आज दिनांक 5एप्रिल रोजी दुपारी 2वाजताच्या सुमारास तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोझरी गावात घडली,याप्रकरणी पोलिसांनी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सुनील दादाराव वंजारी वय 46, रा पांढरी ता. अंजनगाव सुर्जी, असे हत्या झालेल्या पतीचे नाव असून माधुरी सुनील वंजारी (३८) असे अटक केलेल्या संशयित आरोपी पत्नीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मोझरी श्री. साठवणे यांच्या मुलीचा विवाह अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी येथील सुनील वंजारी यांचेशी बारा वर्षांपूर्वी झाला होता.परंतु सुरुवातीपासूनच दारू पिऊन घरात धिगाणा व पत्नीशी भांडण करत असल्याकारनामुळे पती पत्नीमध्ये वाद होत होते,त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून माधुरी आपल्या दोन मुलांसह मोझरी येथे आईकडे राहून एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करत होती, तर पती एका ढाब्यावर मजुरी काम करत होता,

दरम्यान आज दुपारी पती पत्नीमध्ये मोठा वाद झाला व दोघेही एकमेकांवर तुटून पडले.सुनीलने मद्यप्राशन केले असल्याने तो जमीनीवर खाली कोसळताच पत्नीने दोराने हातपाय बांधून त्याला विजेच्या खांबाला बांधून ठेवले.व दोरीने त्याचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली खुद्द पत्नीने दिली आहे,या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी पंचनामा करत आरोपी माधुरी वंजारी हीला अटक केली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनात प्रभारी ठाणेदार संदीप चव्हाण करीत आहे..

पती पत्नीच्या वाद विकोपाला जाऊन अखेर बापाच्या मृत्युवर थांबला.बापाला यमसदनी पाठवुन माय कायमची गजाआड झाली.परंतु दोन्ही चिमुकल्या मुलांचा विचार मायबापांनी केला नाही.अवघे सहा सात वर्षं वय असलेले दोन्ही भावंडे पोरकी झाली आहे.डॉ दोन्ही भावंडे म्हाताऱ्या आजीच्या पदरात तोंड लपवून धुमसत रडतांना उपस्थितांचे मन हेलावून गेले होते..

स्थानिक पोलीसांच्या आशिर्वादामुळे मोझरी गावात अवैध दारू आणि वरली मटका व्यवसाय जोरात सुरू आहे,या अवैध धंद्यामुळे आज दोन लहान भावंडे पोरकी झाली असून अनेक कुटूंब उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे,सर्व व्यवसायिक एका राजकीय पक्षाची संबंधित असल्याने यांच्यावर कुठलीही कार्यवाही होत नाही..

-- गौरी देशमुख, जी.प सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT