crime 
विदर्भ

पत्नीने केली पतीची हत्या आणि मुलाने फोडली बापाच्या खुनाला वाचा

चित्रा कापसे

तिरोडा (जि. गोंदिया) : पत्नीने  माहेरच्या माणसांसोबत मिळून खुद्द आपल्या पतीचाच खून केला. ही आत्महत्या आहे असा निर्णय  दिल्यानंतर पोटच्या मुलानेच हा खून असल्याचे सांगत आपल्या  वडिलांना न्याय मिळवून दिला आहे.
‘मुंडीकोटाच्या एमजीनगरातील अनिल छत्रीलाल शेंडे (वय ३०) याचा सोमवारी (ता. २५) रात्री साडेअकराला पत्नीसह सासू, सासरे आणि साळा यांनी गळा आवळून खून केला. या खुनाला त्याच्या मुलाने वाचा फोडली अन चोवीस तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना गजाआड केले. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यात आल्याची चर्चा तालुकाभर आहे.       
अनिल शेंडे हा गोंदिया तालुक्यातील कुडवा येथील मूळचा रहिवासी. त्याचा विवाह मुंडीकोटा येथील कृष्णकलासोबत २००५ मध्ये मांग गारुडी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे झाला. काही दिवस स्वगृही राहिल्यानंतर तो पत्नीच्या बाळंतपणाकरिता एमजीनगरातील मुंडीकोटा येथे आला. तेव्हापासून अनिल एमजीनगर मुंडीकोटा येथे सासुरवाडीत राहात होता. अनिलची सुरुवातीची काही वर्षे  गुण्यागोविंदाने गेले. नंतर काळाच्या ओघात परिस्थिती बदलत गेली. पती- पत्नीत चारित्र्याच्या संशयाचे ग्रहण लागले. पती-पत्नीत लहानसहान गोष्टींवरून भांडणाची ठिणगी उडू लागली. येथूनच बहरलेल्या वेलीला संशयाच्या वेलीने सुकवून दिले.
मांग गारुडी समाजात कौटुंबिक वादाचे निवारण करण्यासाठी जात पंचायत आहे. या पंचायतीने दिलेला न्याय समाजबांधवांना पाळणे बाध्य असते. परंतु, अलीकडे जात पंचायतीच्या न्यायव्यवस्थेला लागलेल्या ग्रहणामुळे अनिलला न्याय मिळाला नाही. अनिल जात पंचायतीत आपल्या पत्नीला आपल्याकडे सोपवण्यात यावे, यासाठी दाद मागत होता. मात्र, न्यायपंचायतीला अनिलची मागणी पचनी पडली नसल्याने त्याला जीव गमवावा लागला. अनिलने संसाराची मागणी केली. मागणी नाकारण्यात आली. त्याच मागणीचे पर्यवसान वादात झाले. नेहमीचे वाद कायमचे संपुष्टात यावे याच हेतूने अनिल प्राणास मुकला. २५ मेची रात्र अनिलसाठी अखेरची ठरली. म्रुतदेह अंतिम संस्काराची वाट बघत होता. अखेर दुस-या दिवशी सायंकाळी ५ च्या सुमारास स्मशानभूमीत जाणारा म्रुतदेह अमित शेंडेच्या फिर्यादीवरून तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला. उत्तरीय तपासणीअंती ही आत्महत्या नसून हत्येचा प्रकार आहे हे समजताच पोलिसांनी चारही आरोपींना जेरबंद केले.  अनिलच्या मुलाचे बयाण पोलिसांना तपासात बळकटी देऊन गेले.
समाज पंचायत प्रत्येक वेळी योग्य ठरेलच असे नाही, असे अमित शेंडे यांनी दाखवून दिले. यामुळे समाज पंचायतीच्या विरुद्ध जाऊन पोलिसांना दाद मागितल्यास न्याय मिळतो, हे अनिलने आपल्या प्राणाची आहुती देऊन सिद्ध केले आहे.
मुलीच्या अट्टहासात पाच मुलेच जन्माला आली

सविस्तर वाचा - ...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन
मांग गारुडी समाजात मातृसत्ताक पद्धती आहे. मुलीच्या अट्टाहासात अनिलला ५ मुलेच झाली होती. कृष्णकलेला मुलीचा हट्ट नडला आणि ती यामुळेच ५ मुलांना जन्म देऊन विवाहित असूनदेखील प्रेमाच्या जाळ्यात अडकली असावी. एकीकडे समाज मुलांसाठी सुनेची हत्या, छळ पाहण्यास मिळताे. पण अशिक्षित म्हणून ओळखला जाणारा समाज स्त्री उद्धारक म्हणून आजदेखील प्रेरणा देणाराच आहे. असे असले तरी विवाहोपरांत प्रेमसंबंध कोणत्याच समाजाने आजपर्यंत स्वीकारले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या मंत्रिमंडळात कोण इन, कोण आउट? संभाव्य यादी समोर; महाराष्ट्रातूनही 'हे' नाव चर्चेत, धर्मेंद्र प्रधानांचं खातं कुणाला?

Chhatrapati Sambhajinagar: घाटीची वाटचाल कॉर्पोरेटकडे ; १७ वर्षांनंतर ट्रॉमा आयसीयूचा कायापालट; वॉर्ड २९ चे लोकार्पण

Satyajeet Tambe: पेपरफुटीने महाराष्ट्रातील परीक्षा व्यवस्थेचा बुरखा फाडला: आमदार सत्यजित तांबे; ४ लाख २८ हजारांहून उमेदवारांवर अन्याय

Latest Marathi News Update : खिद्रापूरमध्ये कोपेश्वर मंदिर बंद; अतिक्रमण वादावर ग्रामस्थांचे साखळी उपोषण

Sankashti Chaturthi : श्रीगणेश उपासना, वटवृक्ष आणि आत्मचैतन्याचा जीवनसाधनेशी असलेला गूढ संबंध

SCROLL FOR NEXT