murder murder
विदर्भ

यवतमाळ : पुसद येथे कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : येथील विटाळा वॉर्डात घरगुती वादातून पतीने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून (Wife's murder) केला. ही घटना शुक्रवारी (ता. १७) रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. रेखा नारायण खराबे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरून पती नारायण यादवराव खराबे (वय ४०, रा. विटाळा वॉर्ड) पसार (Husband absconding) झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, पुसद शहरातील विटाळा वॉर्ड येथे रहिवासी असलेल्या नारायण यादवराव खराबे आणि पत्नी रेखा यांच्यात शुक्रवारी रात्री घरगुती कारणावरून घरात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाली. पती नारायणने रागाच्या भरात पत्नी रेखाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर पती नारायण पसार (crime News) झाला.

घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर रेखाला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रेखाला मृत घोषित केले. उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT