file photo 
विदर्भ

रानडुकराने घेतला मजुराचा बळी 

सकाळ वृत्तसेवा

चिमूर (जि. चंद्रपूर) : वरोरा तालुक्‍यातील गुजगव्हान येथील बकऱ्या चारणाऱ्या गुराख्यावर रानडुकराने हल्ला करून जखमी केल्याची घटना वनपरिक्षेत्र चिमूरअंतर्गत येणाऱ्या गुजगव्हान शेतशिवारात शुक्रवारी (ता. 27) दुपारी बारा वाजतादरम्यान घडली.

जखमी गुराख्यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पाच वाजता त्याचा मृत्यू झाला. रामभाऊ किसना धारणे (वय 68, रा. गुजगव्हान) असे मृताचे नाव आहे. 

रानडुकराचा हल्ला 

चिमूर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गुजगव्हान येथील रहिवासी रामभाऊ किसना धारणे यांचा बकऱ्या पाळण्याचा व्यवसाय आहे. रोजच्याप्रमाणे ते सकाळी बकऱ्या घेऊन चारण्यासाठी गावाजवळील शिवारात गेले. दरम्यान दुपारी बारा वाजता राजेश्वर राजनहिरे यांच्या शेतात ते बकऱ्या चारत होते. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने रामभाऊवर हल्ला केला. 

शेतकऱ्यांची आरडाओरड 

तेव्हा शेतशिवारातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने रानडुकराने तेथून पळ काढला. यावेळी जखमी रामभाऊला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान सायंकाळी सवापाच वाजता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती चिमूर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना देण्यात आली. 

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा 

वृत्त लिहीपर्यंत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली नाही. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात आजवर अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT