wild elephant  Sakal
विदर्भ

Gadchiroli Wild Elephant : गडचिरोलीतून रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्यात दाखल

Gadchiroli Wild Elephant : मागील काही दिवसांपासून गडचिरोलीत भटकणारे रानटी हत्ती वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. वनविभाग ड्रोनद्वारे हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मागील दोन दिवसांपासून गडचिरोली शहराच्या अगदी जवळ पोहोचलेले रानटी हत्ती सोमवार (ता.३०) रात्री वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

मागील तीन वर्षांपासून ओडीशातून छत्तीसगड मार्गे गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत सतत मुक्काम ठोकणारे रानटी हत्ती आतापर्यंत धानोरा, कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी तालुक्यात फिरत होते. मात्र पोर्ला परिसरात आलेल्या हत्तींच्या एका कळपाने शनिवारी रात्री कठानी नदी पार करून खरपुंडी परिसरात प्रवेश केला.

येथून सालईटोला, माडेतुकूम, बोदली, मसेली अशी गावे पार करत हे हत्ती गडचिरोली शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सेमाना हनुमान देवस्थान व वाकडी गावातील परिसरात भटकत होते. येथील धानपिकावर ताव मारून सोमवारी हत्तींनी मुडझा, पुलखल परिसराकडे मोर्चा वळवला. रात्री ८. ३० वाजताच्या दरम्यान वायुनंदना वीज निर्मिती प्रकल्पाच्या परिसरातून हत्तींनी वैनगंगा नदी पार केली.

जवळपास २८ ते ३० रानटी हत्तींचा हा कळप असून हे हत्ती वैनगंगा नदीच्या पलीकडच्या काठावरील चंद्रपूर जिल्ह्यातील वाघोली गावाच्या परिसरात पोहोचले आहेत.आता हे रानटी हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी भटकतील की पुन्हा गडचिरोली जिल्ह्यातच परत येतील, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. वनविभाग ड्रोन कॅमेराद्वारे हत्तींवर लक्ष ठेवून आहे.

यापूर्वीही केला होता प्रयत्न...

हत्तींच्या कळपाने यापूर्वीही आरमोरी, देसाईगंज तालुक्याच्या परिसरातून वैनगंगा नदी पार करून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला होता. पण रणमोचन गावाजवळ फटाके फोडून, टायर जाळून ग्रामस्थांनी हत्तींना पळवून लावले होते. त्यामुळे हत्ती रात्रीच पुन्हा वैनगंगा नदी पार करून गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात पोहोचले होते. त्यानंतरही एक नर हत्ती रेकी करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता. मात्र शेतातील विजेच्या स्पर्शाने त्याचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: CSK विरुद्ध काय प्लॅन केला होता? सूर्यवंशीचा खुलासा; वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबद्दल म्हणाला, 'केक लावतील म्हणून...'

'माझ्या भावाने मला 'घंटागाडी'....' ठरलं तर मग मालिकेतील जुई गडकरीला घरी काय नावाने हाक मारतात? अभिनेत्री म्हणाली...

Latest Marathi News Live Update : विदर्भात अवकाळी पावसाचा कहर; रब्बी पिकांचे मोठे नुकसान

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

SCROLL FOR NEXT