wild pig  
विदर्भ

जीवाच्या आकांताने दोघेही सुसाट धावत होते अन्‌ पुढे घडले असे.... 

सकाळ वृत्तसेवा

खरांगणा मोरांगणा (जि. वर्धा) : शिकाऱ्यांनी रानडुकराची शिकार करण्यासाठी सापळा लावला होता. मात्र, या सापळ्यात रानडुक्कर आणि त्याची शिकार करण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटलेला बिबट असे दोघेही अलगद अडकले. यात दोघांचाही मृत्यू झाला. 

ही घटना सोमवारी, 8 जून रोजी दुपारी वर्धा जिल्ह्यातील खरांगणा वनपरिक्षेत्राच्या अंतर्गत येत असलेल्या बोथली शिवारातील टेकडीवर घडली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर आल्यानंतर सायंकाळी या घटनेचा खुलासा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शिकार करणारे सुमारे 20 व्यक्ती वाहने घेऊन बोथली शिवारातील टेकडी परिसरात फिरत होते. त्यांनी या ठिकाणी रानडुकराची शिकार करण्यासाठी सापळा लावला. मात्र, या सापळ्यात रानटुकरासह बिबटही अडकला.

बिबट स्वतः रानडुकराच्या मागे त्याची शिकार करण्यासाठी धावत होता. मात्र, तोही रानडुकरापाठोपाठ जाळ्यात अडकला आणि त्यात दोघांचाही मृत्यू झाला. सापळ्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच शिकाऱ्यांनी वनविभागाच्या कारवाईला घाबरून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खरांगणा वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. ताल्हन यांनी चमूसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यासोबत वर्धा आणि नागपूर येथील वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबट्या अद्याप घटनास्थळावरच असून, नागपूरची चमू आल्यानंतर पुढील कार्यवाही पार पाडण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Nashik : अशोक खरातसोबत नाशिकचा बडा नेता, अनिसकडून गंभीर आरोप

PSL 2026 : पाकिस्ताच्या मुश्ताक अहमदचा उद्धटपणा... Live TV वर इंग्लंडच्या खेळाडूची लाज काढायला गेला अन् मग... Video Viral

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरातची SIT कडून सलग १०व्या दिवशी चौकशी

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! युद्ध सुरू झाल्यापासून सोनं 17% कोसळलं; आजचा भाव किती?

Ashok Kharat Case : भोंदू खरात प्रकरणातील 'त्या' पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याने 65 जणांवर गुन्हा; तुमच्याही मोबाईलमध्ये 'ते' व्हिडिओ आहेत?

SCROLL FOR NEXT