विदर्भ

वन्यप्राणी ग्रस्त शेतकर्‍यांचा बोराटी येथे मेळावा 

शंकर जोगी

वडकी (जि. यवतमाळ) : राळेगाव, कळंब व पांढरकवडा या तिन्ही तालुक्यातील जंगलनिहाय परिसरात वास्तव्य करणार्‍या शेकडो वन्यप्राणीग्रस्त शेतकर्‍यांचा दोन वर्षांपासून शेतीचा रोजगार हिरावल्याने आपले जीवन जगण्याचा अधिकार मिळविण्यासाठी, मानव व वन्यप्राणी या प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघावा व आमचे आई-बाबा परत द्या या मागणीसाठी राळेगाव तालुक्यातील बोराटी येथे 11 नोव्हेंबर रोजी वन्यप्राणीग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी एका मेळाव्याचे आयोजन केले होते.

या मेळाव्याला पालकमंत्री मदन येरावार, राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जैस्वाल, जि.प. सदस्य चित्तरंजन कोल्हे, उषाताई भोयर, सौ काकडे, पंचायत समिती सदस्य प्रशांत तायडे उपस्थित होते. यावेळी ज्या तेरा निष्पाप आदिवासी शेतकरी शेतमजुराचा या वाघिणीच्या हल्यात बळी गेला त्या कुटूंबातील सदस्यांना सरकारी नोकरी तसेच वाघीणग्रस्त गावात सरसकट प्रतिकुटूंब दोन लाखांची मदत देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे मागणी पत्र पालकमंत्री मदन येरावार यांना देण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री येरावार यांनी मी प्रत्येकाला नोकरी देउ असे वचन देवू शकत नसल्याने कौशल्य विकासाच्या माध्यमातून ज्यांचे अंगी स्वत:चे पायावर उभे राहण्याची जिद्द असेल व पैशाअभावी अडचण निर्माण होत असेल अशांना कौशल्य विकासाच प्रशिक्षण देवून शासनाच्या मूद्रा योजनेसह अन्य योजनेतून प्राधान्य देवून त्यांचे कुटूंब स्वताचे पायावर उभे राहील असा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. 

यावेळी शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोर तिवारी यांचेसह राळेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार अशोक उईके, मोहदा येथील उपसरपंच विजय तेलंगे, झाडगांव येथील अशोक केवटे यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले. यावेळी अवनी या वाघिणीच्या दहशतीतून मुक्त केल्याने वनविभागाच्या महीला अधिकारी के एम अर्भणा यांचे अशोक केवटे व वाघिणीच्या हल्यात मृत्यू मूखी पडलेल्या कुटूंबातील सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या कार्यक्रमाला वनविभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल एन वाघ, महसूल विभागाचे नायब तहसीलदार विलास दूधपोळे, वीर, कृषि विभागाचे तालूका कृषी अधिकारी संजय पाठक, राळेगावचे माजी नगराध्यक्ष बबनराव भोंगारे, अॅड प्रफुल्ल चव्हाण, भा ज पा राळेगाव तालुकाध्यक्ष बाळासाहेब कविश्वर, डॉ कुणाल भोयर, जिल्हा परिषद सदशया प्रीती काकडे संजय काकडे डॉ अक्षय जव्हेरी, वन्य प्राणी ग्रस्त गावाचे सरपंचासह शेकडो नागरिकांनी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

ICC Womens World Cup 2025 : स्पर्धेत राहण्यासाठी टीम इंडिया स्ट्रॅटेजी बदलणार? दोन पराभवानंतर हरमनप्रीत कौरला कठोर निर्णय घ्यावेच लागणार...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Solapur News: 'शेतकऱ्यांचा माजी गृहराज्यमंत्र्यांच्या दारात टाहो'; दोन वर्षांपासून पाच कोटींची रक्कम थकवली, साेलापुरात बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT