Wine smugglers fall down with wine on road  
विदर्भ

तळीराम दारूतस्कराचा गेला तोल अन रस्त्यावरच पडला दारूचा सडा; चंद्रपुर जिल्ह्यातील घटना

संदीप रायपुरे

चंद्रपूर: दारूबंदीला पाच वर्ष लोटली पण राजरोसपणे दारूविक्री सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्याला लागून तेलंगणाची सिमा आहे.छुप्या मार्गाने या मार्गातून दारूतस्करी होते. पण धाब्यातील काही दारूतस्कर आता दिवसाढवळया तस्करी करू लागले आहेत. 

आज सायंकाळच्या धाब्यातील  तस्कर सुमारास तेलंगणातून बाईकने दारू घेउन येत होता. दारूतस्करी करतांना त्याने बरीच ढोसली.अनं गावाजवळ येताच बाईकवरून त्याचा तोल गेला. जवळपाच चार पेटया दारूचा सडा मार्गावर पडला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. 

इकडे तळीराम तस्कराने आपल्या सहकार्याना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अन मग काय रस्त्यावर पडलेली दारू जमा करण्यात ते गुंतले. गावातील माजी सरपंच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दारूतस्करांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. शेवटी बÚयाच वेळानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.  

रस्त्यावर पडलेला दारूसाठा जप्त करण्यात आला.याप्रकरणी प्रविण घोगरे याला ताब्यात घेण्यात आले. दारू मार्गावर पडल्यानंतर तस्कराकडून दारू जमा करतांनाचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला अनं या प्रकाराची जोरात चर्चा समाजमाध्यमात रंगली.

संपदान - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

SCROLL FOR NEXT