file
file 
विदर्भ

काश! मै भी अपनों से प्यार कर पाता ; ऑटोचालकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

टेकाडी (जि.नागपूर)  :  व्यसनाच्या आहारी जाउन कुटूंबापासून दूर राहणा-या पतीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मृृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातील मजकुराने सर्वांचे मन हेलावून गेले. "ये मन नम है' या शीर्षकाने सुरुवात झालेल्या पत्रातील शेवटच्या "काश, मै भी अपनों से प्यार कर पाता' या शब्दांनी कुटुंबातील कलह स्पष्ट केला. कन्हान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

रवींद्रने "सुसाइड नोट'मधून जाहीर केल्या वेदना
रवींद्र माणिकराव रंगारी (वय 45, रामनगर गुरफुडे ले-आउट) याला एक दहा वर्षांची मुलगी आणि पत्नी असे छोटेसे कुटुंब आहे. उदरनिर्वाहासाठी रवींद्र हा ऑटो चालवायचा. काही वर्षापूर्वी त्याला दारूचे व्यसन असल्याची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. परंतु सध्या तो दारूच्या व्यसनाच्या दूर असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. काही कारणास्तव एक-दोन वर्षांपासून पती-पत्नीच्या संसारात खटके उडायला सुरुवात झाली. कुटुंबातील कलह हळूहळू वाढत गेला. पत्नी मुलीला घेऊन माहेरी राहू लागली. रवींद्र हा कन्हान येथे राहत्या घरी एकटा राहू लागला. कदाचित तोच एकांतवास त्याला वेदना देणारा ठरला. मंगळवारी सकाळी रवींद्रने घरच्या हॉलमधील सिलिंग फॅनला दोराने गळफास लावून आत्महत्या केली आणि बाजूला सुसाइड नोट लिहून ठेवली होती. त्यात "ये मन नम है' या शब्दांतून त्याने दुःख व्यक्त केले. कन्हान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून फिर्यादी हरीश माणिकराव रंगारी (सत्रापूर) यांच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

काय लिहिलंय "सुसाइड नोट'मध्ये
"कुछ ऐसा नहीं जो मुझे आत्महत्या से रोक पाता या रोक पाये.... प्यार में कुछ तो बात होती है, प्यार किये जाने में बहुत प्यार जिए जाने में बहुत कुछ है. प्यार हर संघर्ष का आधार, प्यार प्रतिरोध का हथियार, प्यार अपने अपने होने का विस्तार.. मृत्यू अपने हर स्वरूप में प्यार की पनाहगाह, काश, मै भी अपनों से प्यार करना सीख लेता...रवींद्र रंगारी...' अशा शब्दांत रवींद्रने भावना व्यक्‍त केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

Shivsena : ''मुंबईतल्या ३७ मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचे फतवे'' शिवसेनेचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल

Monali Thakur : "या दुःखातून मी सावरेन कि नाही..."; आईच्या निधनानंतर गायिकेने शेअर केली इमोशनल पोस्ट

Ulhasnagar News : उल्हासनगरातील 251 मतदान केंद्रावर 1255 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा ताबा

Snapchat Account Recovery : स्नॅपचॅट डिलीट झालय ? फोटो आणि मेसेज 'असे' मिळवा परत

SCROLL FOR NEXT