कोरची : जलयुक्त शिवार योजनेचा तुटलेला बंधारा.  
विदर्भ

चार महिन्यांतच दुभंगले जलयुक्त शिवार योजनेचे नवीन बंधारे

सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील बोरी ग्रामपंचायत हद्दीतील हुडुकदुमा येथे चार महिन्यांपूर्वी जलयुक्त शिवार योजनेतून बांधण्यात आलेले दोन सिमेंट बंधारे थोड्याच पावसात दुभंगले असून, बंधाऱ्यांचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेची सूत्रे स्वीकारून राज्यभरात जलयुक्त शिवार योजनेच्या कामांना गती दिली. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत मोठ्या प्रमाणावर काम केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून बोरी ग्रामपंचायत हद्दीतील हुडुकदुमा येथे 10 टीसीएम क्षमतेचा एक बंधारा जंगलातून येणाऱ्या नाल्यावर लक्षावधींचा खर्च करून बांधण्यात आला. कोरची तालुक्‍यात पडयालजोब येथे तीन बंधारे, घुगवा दोन, हेटाळकसा पाच, हुडुकदुमा दोन, खसोडाला दोन, काडे दोन असे सोळा बंधारे मंजूर करण्यात आले.
सोळाही बंधारे कंत्राटदारांनी स्वत:च ले-आउट टाकून काम केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, कनिष्ठ अभियंता किंवा उपविभागीय अभियंता यांनी कधी भेट दिली नसल्याचे हुडुकदुमा ग्रामसभेचे बलूराम हिचामी यांनी सांगितले. अल्पावधीत बंधारे तुटल्याने विभागीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. यासंदर्भात उपविभागीय अभियंता बरडे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पंजाबमध्ये माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT