kesari card.jpg 
विदर्भ

धान्य वाटपाची अट शिथील... वाचा आता पुढे काय होणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तुंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमॅट्रीक पडताळणी न करता त्यांना धान्य वाटप करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु सदर आदेशास मुदतवाढ न मिळाल्याने मे महिन्यात लाभार्थ्यांना बायोमॅट्रीक पडताळणी करुनच (आंगठा दाखवून) धान्य मिळणार होते. मात्र कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मे महिन्यात रेशनद्वारे अन्न-धान्याचे वाटप करताना ई-पॉसची अट शिथील करण्यात आली आहे. त्यामुळे या महिन्यात लाभार्थ्यांना अंगठा न दाखवताच धान्य मिळेल. विशेष म्हणजे ‘सकाळ’ने या विषयी प्रकाश टाकला होता. 

राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कोविड 19 आजारास प्रतिबंध व नियंत्रण यासाठी तातडीच्या व आपत्कालीन उपाययोजना सुरु करण्यात आलेल्या आहेत. यात रुग्ण शोध मोहीम, रुग्णांचे विलगीकरण व एकंदरच विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण या बाबींचा समावेश आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तुंचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमॅट्रीक पडताळणी न करता रास्त दुकानदारांनी स्वतःचे आधार अधिप्रमाणीत करुन 3 मेपर्यंत धान्य वाटपाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु सदर सुविधेला मुदतवाढ न दिल्याने रेशन दुकानातूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता होती. दरम्यान सदर आदेशाला आता शासनाने मुदवाढ दिली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. 

त्रयस्थ व्यक्तीची उपस्थिती आवश्‍यक
रेशन दुकानातून धान्य वाटप करताना शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती आवश्‍यक आहे. त्यामुळे ई-पॉसला मुदतवाढ दिली असली तरी धान्य वाटप शासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीतच करावे लागणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT