woman died in tiger attack in brahmpuri of chandrapur 
विदर्भ

बापरे! घराच्या मागेच लपून होता वाघ, सरपण आणायला जाताच महिलेवर केला हल्ला

श्रीकांत पेशट्टीवार

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : घराच्या मागील भागात ठेवलेले सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी (ता. 7) तालुक्‍यातील चिचगाव येथे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सायत्रा श्रीराम ठेंगरे (वय 50), असे मृत महिलेचे नाव आहे.

तालुक्‍यातील चिचगाव या गावालगत जंगल आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे येथील नागरिकांना नेहमीच दर्शन होत असते. दररोजच्या स्वयंपाकासाठी वापरात येणारे सरपण अनेकजण जमा करून ठेवत असतात. ठेंगरी कुटुंबीयांनीही घराच्या मागील भागात सरपण ठेवले होते. सायंकाळच्या सुमारास घरामागील सरपण आणण्यासाठी सायत्रा ठेंगरी ही महिला गेली होती. यावेळी अचानक वाघाने हल्ला करून घटनास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. यात तिचा मृत्यू झाला.

सरपण आणण्यासाठी गेलेली महिला परतली नसल्याने कुटुंबीयांनी घरामागे बघितले. मात्र, तेथे ती आढळून आली नाही. त्यामुळे इतरत्र चौकशी केली असता महिलेचा मृतदेह अर्धा किलोमीटर अंतरावरील जंगलात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: शफाली वर्माचे २४ चेंडूत अर्धशतक अन् दोन वर्ल्ड रेकॉर्ड; स्मृती मानधनालाही तिच्याच समोर टाकलं मागे

टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी घेणारा अनिल पंडित कोण? लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध...

11 Fours, 2 Sixes... रिंकू सिंगचं सलग दुसरं शतक! आता तरी टीम इंडियात पुन्हा जागा मिळणार का?

पुढच्या २१ दिवसांत ३ राशींना धनलाभाची संधी, करिअर अन् व्यवसायात होऊ शकते प्रगती

IND W vs ZIM W, 2nd T20I: शफालीचं वादळी अर्धशतक अन् स्मृतीचंही आक्रमण, भारताने विजयासह मालिकाही टाकली खिशात

SCROLL FOR NEXT