woman died in tiger attack in mool of chandrapur 
विदर्भ

पोटाची खळगी भरण्यासाठी जंगलात गेली, पण वाघाच्या हल्ल्यात गेला बळी

सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) : जंगलात मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. कल्पना नामदेव वाढई (वय ५४) मृत महिलेचे नाव आहे. 

जंगलात सध्या सर्वत्र मोहफुले आली आहेत. ग्रामीण भागात मजुरी नसल्यामुळे गावकरी मोहफुले वेचून त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आगडी येथील कल्पना वाढई आणि तिची आई कौशल्या मांदाळे गावाला लागूनच असलेल्या जंगलात मोहफुले वेचायला गेल्या. मोहफुले खूप उशिरापर्यंत पडतात. त्यामुळे कल्पनाची आई कौशल्या मांदाळे जेवायला घरी आली. त्यानंतर कल्पना येणार होती. मात्र, बराचवेळ लोटूनही कल्पना घरी आली नाही. त्यामुळे आईने नातवाला कल्पनाला बोलविण्यासाठी पाठविले. नातवाने जंगलात जाऊन शोधाशोध केली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे तो गावकऱ्यांना घेऊन जंगलात गेला. तेव्हा कक्ष क्रमांक ११५ मध्ये कल्पनाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनपाल प्रशांत खनके, वनरक्षक राकेश गुरनुले, पठाण, पंचायत समिती सदस्य वर्षा लोनबले, दामोधर लेनगुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: ठाणे हादरलं! भाजप आमदारांच्या घरासमोरच गोळीबार; १ जण गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Latest Maharashtra News Updates : धुळे बाजार समितीच्या आवारात घाणीचे साम्राज्य

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

SCROLL FOR NEXT