Ambulance 
विदर्भ

रुग्णालयात नेताना झाली महिलेची वाहनातच प्रसूती... 

सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर (जि. अमरावती) : तालुक्‍यातील येवदा येथून दर्यापूरला येत असताना एका महिलेची भररस्त्यात प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. येवदाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी नातेवाईक येवदा येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात घेऊन गेले. मात्र, अवस्था बिकट असल्याने आमच्या येथे प्रसूती होत नाही, दर्यापूरला जा, असे कारण पुढे करून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या महिलेला दर्यापूरला नेण्यास सांगितले. दरम्यान, गावापासून पाच किलोमीटर अंतरावर या महिलेची गाडीतच प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकारामुळे महिलेच्या जीवितास काही झाले असते, तर त्याला जबाबदार कोण, असा गंभीर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी महिलेचे नातेवाईक तसेच येवदा येथील ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगण्यात येते. 

या प्रकरणात आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा एका महिलेच्या जिवावर उठणार होता. ही वेळ भविष्यात कोणावरही येऊ नये याकरिता आरोग्य विभागाने या बाबीची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

संबंधित महिलेला प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणार होती. रक्त येवदाच्या प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपलब्ध नसल्याने दर्यापूर येथील उपकेंद्रात नेण्यास सांगितले. येथील डॉक्‍टरांनी नियमित तपासणी करून तारीख दिली होती. मात्र, घरच्यांनी उशीर केल्याचे निदर्शनास आले. मी त्यावेळी उपस्थित नव्हतो. माझ्याकडे वरुड येथील अतिरिक्त प्रभार आहे. 
-डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, येवदा. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT