woman hide abortion of herself in wardha  
विदर्भ

गर्भपात लपवण्यासाठी 'तिनं' स्वतःच रचलं षड्‌यंत्र; पोलिसांच्या चौकशीत समोर आला धक्कादायक प्रकार 

मंगेश वणीकर

हिंगणघाट (जि. वर्धा) : एका गर्भवतीला पहाटेच्या वेळी दोन अनोळखी स्त्रियांनी घरून बाहेर नेत बाळंतपण करून नवजात अर्भक घेऊन पळाल्याचे प्रकरण पोलिसांत पोहोचल्यावर त्या महिलेने झालेला गर्भपात लपविण्यासाठी स्वतःच षड्‌यंत्र रचल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. शहरातील शास्त्री वॉर्ड येथील ही घटना आहे. 

ही विवाहिता गर्भवती असताना काही महिन्यांपूर्वीच तिचा गर्भपात झाला. मात्र, ही बाब तिने भीती पोटी कुटुंबापासून लपवून ठेवली होती. प्रसूतीची वेळ जवळ येत असल्याचे पाहून तिने नाट्य रचले. कोणीतरी जादूटोणा केल्यानेच हा प्रकार घडला असून दोन अनोळखी महिलांनी बुधवारच्या पहाटे येऊन या विवाहितेला घराबाहेर नेले. 

अज्ञातस्थळी बाळतपण झाल्यावर तिचे नवजात अर्भक पळविल्याचा व कोणीतरी जादूटोणा केल्यानेच हा प्रकार घडल्याचा बनाव तिने पती व कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने तिला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

सदर महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता त्या महिलेचे जवळच्या काळात बाळंतपण झाल्याचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही. परंतु त्या महिलेची मानसिक स्थिती असंतुलित असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. किशोर चाचरकर यांनी दिली.

दरम्यान, हे प्रकरण पोलिसांत गेल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता ही मनघडन घटना असल्याचे तपासात उघडकीस आल्याची माहिती ठाणेदार संपत चौहान यांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Kale Murder Case: काळे हत्येचा धागा आंदेकर टोळीपर्यंत? आरोपींची नावे अन् ‘कनेक्शन’ समोर... मोठी अपडेट

'विवेक मेरी माँ मर रही है' नॉन व्हेज खात शाहरुख मित्राला म्हणाला...'क्या तुम जानते हो विवेक?'

Pandharpur Kartiki Ekadashi: एकनाथ शिंदेंच्या हस्ते सपत्नीक पांडुरंगाची महापूजा; नांदेडचे वालेगावकर दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी

Pune Lawyers Protest : वकील उद्या लाल फीत लावून कामकाज करणार, वकील संरक्षण कायद्याची मागणी

भारताकडून अंडर १९ वर्ल्ड कप खेळलेल्या क्रिकेटपटूचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT