संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

जुना धामणगावात 32 वर्षीय महिलेविषयी नेमके काय घडले? वाचा...

संतोष तापकिरे

धामणगावरेल्वे : जुना धामणगाव येथील वैभव लक्ष्मीनगरात एका 32 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने भोसकून खून झाला. त्यात महिलेचा मुलगाही गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नागपुरात उपचार सुरू आहेत. मात्र, नेमका कशामुळे महिलेचा खून करण्यात आला हे कळू शकले नाही.


गीता रेवन अंबाडरे (32, रा. लालबरा, जि. बालाघाट) ही आठ वर्षांपासून वैभवलक्ष्मीनगरात राहून शेळीपालनासह मोलमजुरी करीत होती. बुधवारी (ता.29) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने वार करून गीता यांचा खून केला. अकरा वर्षीय रवींद्र या घटनेमुळे घाबरला. त्यालाही जबर मारहाण झाली. मारहाणीत महिलेच्या डोक्‍यावर हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या. तिला उपचारार्थ यवतमाळ येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.

मृत महिलेची बहीण प्रमिला सुरेश सोनवणे यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. ठाणेदार ब्रह्मदेव शेळके यांचे पथक तपास करीत आहे. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक श्‍याम घुगे, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, गुन्हे अन्वेषण शाखेचे आनंद पिदूरकर यांनी भेट दिली व घटनेची माहिती दिली. पोलिस दुसऱ्याही दिवशी घटनास्थळी तळ ठोकून होते.

दोन स्मार्टफोन सापडले
पोलिसांना घटनास्थळी रात्रीला एक व सकाळी एक, असे दोन स्मार्टफोन सापडले. यावरून पोलिसांनी कॉलडिटेल्सची तपासणी सुरू केली.

कुत्राही झाला जखमी
महिलेकडे एक पाळीव कुत्रा होता. गुरुवारला  सकाळी तो जखमी अवस्थेत झुडूपांमध्ये बसलेला दिसला. याप्रकरणी तपास केला असता रात्री हत्याकांड सुरू असताना भुंकल्याचा आवाज होऊ नये म्हणून हल्लेखोरांनी त्यालाही जखमी केल्याची शक्‍यता आहे.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT