Woman killed in tiger attack Gadchiroli news 
विदर्भ

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; मोहफूल वेचणे बेतले जीवावर

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना शनिवारी दिभना जंगल परिसरातील एफडीसीएमच्या कक्ष क्रमांक २ मध्ये सकाळच्या सुमारास निदर्शनास आली. शोभा नामदेव मेश्राम (वय ५०, रा. राजगाटा माल) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शोभा मेश्राम शुक्रवारी (ता. २६) जेप्रा लगतच्या जंगल परिसरात मोहफुले वेचण्यासाठी गेली होती. मात्र, ती घरी परतली नाही. शुक्रवारी तिचा शोध घेतला, मात्र दिसली नाही. शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम राबवली असता तिला वाघाने ठार केल्याचे निदर्शनास आले. वाघाने तिला एक ते दीड किलोमीटर ओढत नेल्याचे आढळून आले. वनविकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

चार महिन्यांत चार बळी

विशेष म्हणजे अमिर्झा परिसरात गेल्या चार महिन्यांत वाघाने चार जणांचा बळी घेतला आहे. यामध्ये राजगाटा येथील शेतकरी गोविंदा धर्मा गावतुरे, गोगाव येथील महिला मंजुळाबाई बुधा चौधरी, धुंडेशिवणी येथील शेतकरी दयाराम धर्माजी चुधरी व राजगाटा माल येथील महिला शोभाबाई नामदेव मेश्राम यांचा समावेश आहे.

वडगाव येथे शेतकऱ्याची आत्महत्या

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्‍यातील वडगाव येथील शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याचे नाव चंद्रकांत मालेकर (वय ५५) आहे. चंद्रकांत मालेकर यांच्या शेताच्या धुऱ्याबाबत काही व्यक्तींशी भांडण झाले होते. त्यानंतर ते घरी आले. तेव्हा पत्नीशीही त्याचे भांडण झाले. त्यांनी पत्नीला कुऱ्हाडीने गंभीर जखमी केले व स्वतःलाही जखमी केले. शेजाऱ्यांनी पत्नीला उपचारासाठी गडचांदूरला नेले. यानंतर चंद्रकांत शेताकडे गेले होते. तेथेच त्यांनी आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT