file Photo 
विदर्भ

Maharashtra vidhansabha 2019 क्षमता सिद्धीनंतरही महिलांना नगण्य स्थान 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे. या निवडणुकीत महिलांनी क्षमता सिद्ध केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात महिलांना सर्वच पक्षाकडून नगण्य स्थान देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महापौर नंदा जिचकार, माजी महापौर अर्चना डेहनकर, ऍड. नंदा पराते यांनी त्यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली. आतापर्यंतचा पक्षांचा इतिहास बघता त्यांना उमेदवारी मिळेल काय? याबाबत संपूर्ण शहरात उत्सुकता आहे. 
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून भाजप, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांकडून लढण्यासाठी केवळ पुरुष उमेदवारांचीच गर्दी दिसून येते. मात्र, महापौर नंदा जिचकार, माजी महापौर अर्चना डेहनकर, ऍड. नंदा पराते यांनीही पक्षांकडे उमेदवारीची मागणी करीत लक्ष वेधून घेतले आहे. महापौर नंदा जिचकार व माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी अनुक्रमे पश्‍चिम व दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. ऍड. नंदा पराते यांनी हलबाबहुल मध्य नागपुरातून कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली. अलीकडच्या काळात महिलांचे राजकारणात प्राबल्य वाढले असले तरी उमेदवारी देण्याची जोखीम पत्करली नाही. महिलांना उमेदवारी न देण्यामागे निवडून येण्याची क्षमता असलेल्या महिला मिळत नसल्याचे कारण विविध पक्षांकडून पुढे करण्यात येत असले तरी ते खरे नसल्याचे 2017 मध्ये पार पडलेल्या महापालिका निवडणुकीतून सिद्ध झाले. महापालिकेत 151 सदस्य निवडून आले, यापैकी 80 नगरसेविका असून, नगरसेवकांच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. अपक्ष नगरसेविका आभा पांडे या मागील निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत अपक्ष म्हणून तयारी करीत आहेत. महापौर जिचकार, माजी महापौर अर्चना डेहनकर, ऍड. नंदा पराते, आभा पांडे यांनी पक्ष संघटन असो की नगरसेविका म्हणून नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. त्यामुळे आता विधानसभेत भाजप, कॉंग्रेस यांच्यावर विश्‍वास दाखवणार काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
गेल्या 25 वर्षांपासून पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे. उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पक्षाकडे उमेदवारी मागितली. आता चेंडू पक्षाच्या कोर्टात आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी पक्ष संघटनेत काम करत राहील. 
- अर्चना डेहनकर, माजी महापौर व भाजप प्रदेश प्रवक्‍त्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फरसावाले बाबा कोण? मृत्यूमुळे शिष्य आणि भाविक आक्रमक, महामार्ग रोखला

World Record: १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20त शतक! नाबाद १११ धावांनी रचला इतिहास; अनेक विक्रम मोडले, फलंदाजने मैदान गाजवले

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

April Travel Destination: एप्रिलमध्ये ट्रिप प्लॅन करताय? या’ 5 ठिकाणांना भेट देणं ठरेल बेस्ट

बॅट दे रे...! T20 World Cup मध्ये तीन भोपळ्यांनंतर अभिषेक शर्माचा मेसेज येताच काय दिलं शुभमन गिलने उत्तर; पाहा Video

SCROLL FOR NEXT