women insecure in Yavatmal
women insecure in Yavatmal  
विदर्भ

'ती'च्या आब्रुला नातेवाईक, परिचितांकडूनच धोका

सूरज पाटील

यवतमाळ : महिला अत्याचाराच्या घटनांत सातत्याने वाढ होणे, ही चिंतेची बाब आहे. अल्पवयीन, तरुणी, विवाहित महिला इतकेच नव्हे तर अगदी चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यापर्यंत नराधमांनी मजल गाठली आहे. हैदराबाद येथे काही तरुणांनी डॉक्‍टर तरुणीवर अत्याचार करून खून केला. या घटनेने देश ढवळून निघाला होता. खवताळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरात बलात्काराचे 101, विनयभंगाचे 295 गुन्हे घडले आहेत. त्यामुळे "ती'च्या धोक्‍यात आलेल्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

शाळा व महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थिनींना आकर्षित करून विविध प्रकारचे आमिषे दाखविले जाते. प्रेमजाळ्यात येताच शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. काही दिवस हा प्रकार चालल्यानंतर फसवणूक झाल्याची बाब मुलींच्या लक्षात येते. मग न्यायासाठी पीडित पोलिस ठाण्याची पायरी चढतात. मित्र म्हणूनही विश्‍वासाचे नाते निर्माण करणाऱ्यांकडून संधी साधून अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काहींनी तर वडील, काका, मामा, भाऊ या पवित्र नात्यालाच कलंक फासला आहे. 

नातेवाइकांनी अत्याचार केल्यानंतर ही घटना कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली जाते. पीडित गप्प राहिल्याने पुन्हा नातेवाइकांची हिंमत बळावते व शारीरिक शोषणाची मालिकाच सुरू होते. मात्र, हा किळसवाणा प्रकार असह्य झाल्यानंतर अत्याचार पीडितेचा बांध फुटल्यानंतर या घटनांना वाचा फुटते, अशा घटनांची सामाजिक मन हादरून गेले आहे. घरातच "ती' सुरक्षित नसेल तर विश्‍वास ठेवायचा तरी कुणावर?, असा प्रश्‍नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. 

दोन वर्षांपासून ते सात वर्षांपर्यंतच्या अंगणात खेळणाऱ्या चिमुकल्या मुलीचाही अशाच पद्धतीने घात झाला आहे. या घटना का घडत आहेत, त्या मागील कारणे याचे आत्मचिंतन करणेही क्रमप्राप्तच आहे. गेल्या 2019 मध्ये बलात्कार, विनयभंगासोबतच हुंडाबळीच्या दहा, 498 (अ)भादंविच्या 319 असे विविध 737 गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी सर्वच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिस प्रशासनाला यश आले आहे. गेल्या वर्षभरात बलात्काराच्या घडलेल्या गुन्ह्यांतील आरोपी हे पीडितेच्या ओळखीचे, नातेवाईक, प्रियकर, मित्र असल्याची नोंद पोलिस प्रशासनाने घेतली आहे. 


प्रकारानिहाय नोंद गुन्ह्यांची संख्या

  • बलात्कार -101 
  • विनयभंग-295 
  • हुंडाबळी-दहा 
  • 498 (अ)-319 

पळविण्याचे 52 गुन्हे अनडिटेक्‍ट

महिला व मुलींना विविध प्रकारचे आमिषे दाखवून पळवून नेल्याच्या 147 घटना वर्षभरात घडल्या आहेत. त्यापैकी 95 गुन्हे उघडकीस आले आहेत. 52 घटना अजूनही अनडिटेक्‍ट आहेत. यातही नातेवाईक, प्रियकर, मित्रांकडूनच हे कारनामे झालेले आहेत.

सुरक्षेसाठी 'दामिनी'

चिडीमारी, अत्याचार अशा घटना रोखण्यासाठी पोलिस दलात खास महिलांच्या सुरक्षेसाठी "दामिनी' पथक कार्यरत आहेत. त्यासाठी व्हॉट्‌स ऍप क्रमांक व्हायरल करण्यात आला आहे. पालकांनी मुलांवर अतिविश्‍वास न ठेवता आपली जबाबदारी ओळखून जागृत राहिल्यास उद्या त्यांच्यावर रडण्याची वेळ येणार नाही. 

अत्याचाराविषयीच्या चुकीच्या दीर्घकालीन कल्पना 
अत्याचाराची भरभराट अशा समाजात होते, जेथे हिंसामय कृतींना व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला सहन केले जाते. चित्रपट व दूरचित्रवाणी अशा हानिकारक कृतींना हातभार लावतात. अत्याचाराविषयीच्या चुकीच्या दीर्घकालीन कल्पना आहेत. ज्यामुळे बळी पडलेल्यांवर दोष दिला जातो. वास्तविक अधिकांश स्त्रियांवर परिचयाच्या व ज्यांच्यावर विश्‍वास आहे, असेच पुरुष संधी साधतात. ही कृती हिंसक व मानसिक आघातजन्य आहे. 
- डॉ. श्रीकांत मेश्राम, 
मानसोपचारतज्ज्ञ, वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT