File photo 
विदर्भ

विधी महाविद्यालयाचीही महिला हिंसाचार विरोधी समितीकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहरातील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वत:हून, विद्यार्थिनीला झालेल्या मारहाणप्रकरणाची तक्रार महाविद्यालयातील महिला हिंसाचार विरोधी समितीकडे नोंदवून, चौकशीची मागणी केली.
प्राचार्य प्रणय मालवीय यांनी त्याची पुष्टी गुरुवारी (ता. 22) केली. पीडित विद्यार्थिनीवर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे प्राचार्यांनी स्पष्ट केले. या घटनेनंतर पोलिसांची स्वत:त्र चौकशी सुरू असताना, महाविद्यालयाच्या हिंसाचार विरोधी समितीही चौकशी करणार आहे. प्रा. भाग्यश्री देशपांडे या समितीच्या अध्यक्षा आहेत. गुन्हा दाखल झालेला विद्यार्थी अजिंक्‍य सिनकर याच्या पालकांसोबत महाविद्यालयाच्या प्रशासनाने संपर्क साधून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. परंतु पालक गुरुवारपर्यंत अमरावतीत दाखल झाले नव्हते. अजिंक्‍य हासुद्धा दुसऱ्याही दिवशी पसार होता. सदर समिती आता नव्याने पीडित विद्यार्थिनीसह घटनेच्या वेळी परिसरात हजर काही विद्यार्थी, प्राध्यापकांचे बयाण नोंदविणार आहे. त्यामुळे अजिंक्‍य याच्यावर समितीकडून नव्याने काही कारवाई होते काय, याकडे अनेकांचे लक्ष्य लागलेले आहे.

कायद्याच्या शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या महाविद्यालयातच विद्यार्थ्याकडून विद्यार्थिनीस झालेल्या मारहाणीची पुनर्रावृत्ती होऊ नये म्हणून भविष्यात विद्यार्थ्यांचे समुपदेशन केल्या जाईल.
-प्रणय मालवीय, प्राचार्य, विधी महाविद्यालय, अमरावती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hospital Rules: रुग्णालयांत नवे नियम लागू! पान-गुटखा सेवन करणाऱ्यांना प्रवेशबंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय, आता तंबाखू खाऊन गेलात तर...

Rahul Gandhi : १५२ पेपर लीक, साडेसात कोटी विद्यार्थ्यांना मनस्ताप तरी एकही दोषी नाही, तरुणांनाच शिक्षा; राहुल गांधींचा PM मोदींवर घणाघात

Nagpur Crime : प्रॉपर्टीच्या वादातून सासरच्या नातेवाइकांकडून जावयाचा खून; तीन आरोपींना अटक

Water Supply Close : पुण्यातील या परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद

Mumbai News: मुंबईकरांना ३ नवीन बीएमसी रुग्णालये मिळणार! १,१२० खाटांसह विविध सुविधा, कधी सुरु होणार?

SCROLL FOR NEXT