विदर्भ

आश्‍चर्य...दात नसलेली चिमुकली खाताहेत कडधान्ये!

मंगेश गोमासे
नागपूर : महिला व बालकल्याण विभागामार्फत निविदा न काढता देण्यात आलेल्या कंत्राटात 6 महिने ते दीड वर्षादरम्यान चिमुकल्यांना आहारात कडधान्याचा पुरवठा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार या वयात "बेबी फूड' देणे आवश्‍यक असताना, त्यांना कडधान्याचा समावेश असलेला आहार कसा काय देण्यात येत आहे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
अंगणवाडींच्या माध्यमातून 2009 सालापासून "टीएचआर' दिल्या जातो. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अंगणवाडीत सहा महिने ते 3 वर्ष वयोगटातील चिमुकले आणि स्तनदा माता व गर्भवती महिलांना "टीएचआर'चा पुरवठा केला जातो. "टीएचआर'वाटपात काम करणाऱ्या राज्यातील पुरवठादारांवर आक्षेप नोंदवीत फेब्रुवारी 2019 मध्ये दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाने 18 कंत्राटदारांकडून "टीएचआर' वाटपाचे काम बंद करण्याचे निर्देश दिले. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने त्यांच्याकडून टीएचआरची जबाबदारी काढून घेतली. मात्र, या कंत्राटदारांना सामावून घेण्यासाठी 6 महिने ते तीन वर्षांदरम्यान चिमुकल्यांना आहारात कडधान्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट दिले. यासाठी कुठलीच निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे सहा ते दीड वर्षापर्यंतच्या मुलाला दात नसल्याने "बेबी फूड' देण्याची पद्धत आहे. तेव्हा त्यांना कडधान्याचा समावेश असलेले अन्न दिल्यास ते खाणार कसे? हा प्रश्‍न आहे. शिवाय त्यांची पचनशक्ती बघता, त्यांना देता येणे शक्‍य नाही. असे असताना, या वयोगटातील मुलांच्या आहारात कडधान्याचा समावेश कसा काय केला? हे कोडेच आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या कामावर शंका निर्माण होत आहे.

सहा महिने ते दीड वर्षाच्या मुलांना टप्प्याटप्प्याने प्रोटीन आहार देण्यात येतो. एक ते दोन वर्षांपर्यंत त्यात थोडा बदल करून सॉलिड आणि त्यानंतर कडधान्यांचा वापर करता येतो. मात्र, अगोदरच कडधान्य देता येणे शक्‍य नाही.
-डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ

चिमुकल्यांना "प्रोटिन्स' मिळावे यासाठी कडधान्य देण्यात येते. ते शिजवून मुलांना देण्यात यावे असे सांगण्यात येते. त्यामुळे यात काही गैर नाही.
-सचिन जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी बातमी! जमिनींच्या पोटहिस्साबाबत राज्यभूमी अभिलेख विभागाचा माेठा निर्णय; लवकरच हाेणार अंमलबजावणी, काय आहे निर्णय?

Chhatrapati Sambhajinagar: कन्नड तालुक्यात ‘वाळवण’ कामांची लगबग सुरू; पहाटेपासून तयारी ; कडक उन्हामुळे गृहिणींचा कल कुरडई, पापड अन् सांडग्यांकडे

Chhatrapati Sambhajinagar: शाळेच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; उपाययोजनेची मागणी

Latest Marathi News Live Update : अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले

'अररर.... एवढा भारी सिनेमा बनवला पण एक', धुरंधर 2 ची 'ती' चूक नेटकऱ्यांनी पकडली, Viral Video

SCROLL FOR NEXT