टाकळघाट ः रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्याला पडलेल्या भेगा.
टाकळघाट ः रस्त्याचे काम सुरू असतानाच रस्त्याला पडलेल्या भेगा.  
विदर्भ

काम 14 कोटींचे; रस्त्याचा दर्जा एकदम फडतूस

सकाळ वृत्तसेवा

टाकळघाट (जि.नागपूर) ः रस्त्याच्या कामाचा 14 कोटींचा निधी मंजूर झाला. बरे नेहमीप्रमाणे काम सुरूही झाले. परंतु, संथगतीने काम सुरू असतानाच रस्त्याला भेगा पडल्यामुळे ग्रामस्थांच्या कपाळावर आढया पडल्या. कामातली ही बोंब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उभे केले. 

सिमेंट रस्त्याच्या कामासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. त्यानंतर कंत्राटदाराने कामाला सुरुवात केली. या कामामध्ये कंत्राटदाराचे हलगर्जीपणा दिसून येतो. हा सिमेंट दुभाजक रस्ता एवढा मजबूत होईल की, कित्येक वर्षांपर्यंत या रस्त्याला तडासुद्धा जाणार नाही, असे भूमिपूजनप्रसंगी राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी भाषणातून ठोकून दिले. काही कालावधीतच चित्र मात्र वेगळेच पाहायला मिळाले. काही महिन्यांतच म्हणजेच सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदरच या सिमेंट दुभाजक रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या. 

कामात मोठा गैरव्यवहार 
या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 
संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे. त्याचबरोबर शनिवारी टाकळघाटचा आठवडी बाजार असतो. गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ राहते व रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो. परंतु, कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे या सिमेंट रस्त्यावर दिवसातून एकदा तरी पाणी मारले जाते की नाही, कोण जाणे! 

मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात चालते काम 
सिमेंट रोडच्या बाजूला मोठी नाली तयार करण्यात येत असून त्यावर सिमेंटची झांकणे तयार करण्यात येत आहेत. हे सर्व कार्य रात्रीच्या वेळी होत असल्याने त्या झाकणावर बरोबर मसालासुद्धा पडत नसल्याने ती झाकणे व्यवस्थित होत नाही. रात्रीच्या वेळी हे काम करताना प्रकाशाकरिता लाइटची गरज असते. परंतु, मोबाइलच्या टॉर्चने हे काम पूर्ण केले जाते, हे विशेष. 

धुळीने ग्रामस्थ त्रस्त 
काम सुरू असताना धूळ उडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर धूळ तयार झालेल्या नवीन रोडवर बसत असल्याने सिमेंट रस्ता तयार झाला की नाही, असे वाटते. सोबतच या ठिकाणी पक्‍के व कच्चे काम करण्याकरिता दोन कॉन्ट्रॅक्‍टर असून दोघांनी समन्वय साधून तोडगा काढणे गरजेचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रिंकू सिंग 16 धावांवर बाद, कोलकाताचा अर्धा संघ परतला पॅव्हेलियनमध्ये

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT