Worker dies in tiger attack in Chandrapur district 
विदर्भ

सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरासाठी वाघ ठरला काळ

सकाळ वृत्तसेवा

राजुरा (जि. चंद्रपूर) : सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला केला. यात मजूर जागीच ठार झाला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील विहीरगाव बिटात घडली. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. उध्दव मारोती टेकाम असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मध्य चांदा वनविभागअंतर्गत येणाऱ्या चुनाळा बिटाला लागून असलेल्या महसूल विभागाचा सर्व्हे नं. 336 मध्ये चुनाळा गावातील मारोती टेकाम हे सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. सरपण गोळा करीत असताना अचानक वाघाने हल्ला केला. या हल्यात टेकाम यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. टेकाम यांच्या शरीराचा अर्धा भाग वाघाने फस्त केला होता. ही घटना शनिवारी उघळकीस आली. या घटनेने परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. 

माजी आमदार निमकरांनी केले सांत्वन

वाघाच्या हल्ल्यात मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच माजी आमदार तथा भाजप नेते सूदर्शन निमकर यांनी मृताचा कुटुंबीयांची भेट घेतली व सांत्वन केले. 

वाघाला जेरबंद करा अन्यथा आंदोलन

राजुरा तालुक्‍यात वाघाचा हल्ल्यांत मृत झालेल्या व्यक्तींचा आकडा दिवसेगणिक फुगत आहे. नित्य होणारे वाघ्रदर्शन, अधूनमधून होणाऱ्या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : दुष्काळसदृश परिस्थितीने सोयाबीन पिकाला फटका; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून मरडसगावात पिकांची केली पाहणी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT