Workers flee again for fear of lockdown Nagpur news 
विदर्भ

भीती! पुन्हा रस्त्यांवर दिसू लागले मजुरांचे थवे; गावी परत जाण्यासाठी पायदळ वारी

सतीश घारड

टेकाडी (जि. नागपूर) : लॉकडाउनमुळे गतवर्षी झालेला त्रास लक्षात घेता ऐन होळीच्या तोंडावर झालेल्या लॉकडाउनमुळे परराज्यातील अनेक मजुरांनी आपापल्या गावी पलायन करायला सुरवात केली आहे. सध्या मध्यप्रदेशच्या परिवहन आयुक्तांकडून महाराष्ट्रामधून मध्यप्रदेशासाठी जाणारी बससेवा २१ ते ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्यासंदर्भाचे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशात वाहतूक उपलब्ध होणार नसल्याने नागपूर-जबलपूर मार्गाने मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील मजुरांनी आपल्या गावी परत जाण्यासाठी पायदळ वारी सुरू केल्याचे दृश्य दिसून येत आहे.

नागपूर शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील मजूर काम करतात. गतवर्षी लॉकडाउनचा धसका घेतलेले मजूर सर्व काही सुरळीत झाल्याच्या आशेने डिसेंबर जानेवारीमध्ये पुन्हा कामाच्या शोधात महाराष्ट्रात परतले. राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली आणि नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत चालले आहेत. अशात पालकमंत्री नितीन राऊत यांनी ३१ मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित केले. हातावर पोट असलेल्या कुठल्याही सर्वसाधारण नागरिकांचा विचार न करता अशा टिकाही यावेळी जिल्हयातून त्यांच्यावर होत आहेत.

मध्यप्रदेशचे परिवहन आयुक्तांकडून कोरोनाचा संसर्ग शमविण्यासाठी २१ मार्च ते ३१ मार्चपर्यंत महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात सुरू असलेल्या बस वाहतूक बंद करण्याचे आदेश काढले आहेत. यावेळच लॉकडाउन कमी दिवसांचे आणि शिथिल असून बांधकाम व कारखाने सुरू आहेत. मात्र, होळी हा सण पुढे असल्याने मजुरांनी आपल्या गावाकडे पायदळच निघण्याचा निर्णय घेतल्याने सध्या नागपूर-जबलपूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पलायन करणारे मजूर दिसून पडत आहेत.

कुणाकडे मास्क नाही तर कुणाकडे पुरेसा पैसाही नाही

शेकडो मैल प्रवास कापणारे मजूर सध्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर निघाले आहेत. अशात कुणाकडे मास्क नाही तर कुणाकडे पुरेसा पैसाही नाही. रस्त्याने सोशल डिस्टन्स तर नाहीच नाही. नागपूर ते कामठी बंद असले तरी कन्हान पुढे सर्व काही सुरू आहे. अशात निघालेला मजूर वर्ग कुठल्याही चाचणी आणि उपचाराशिवाय पुढे जात असेल तर वाहतूक किंवा शहरे बंद जरी केली तरी संसर्ग टाळता येणार नाही, यात कुठलीही शंका नाही. अशात शासन या मजुरांसाठी काय करते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT