file Photo
file Photo 
विदर्भ

कामठीत धाकधूक वाढली, उत्सुकता शिगेला 

सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर) : मतदारसंघात कॉंग्रेसचे सुरेश भोयर विजयी होणार की भाजपचे कमळ फुलणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मतमोजणीच्या सर्व फेयया पूर्ण झाल्यानंतर दुपारी एकच्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्‍यता आहे. 
निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षांतील उमेदवारांनी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे पाहावयास मिळाले. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर प्रचाराच्या मैदानात अनेक आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. उद्या मतमोजणी असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार असल्याने विविध पक्षांच्या उमेदवारांसह त्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नाकरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काय होणार, कोणाला किती मते मिळतील, कसा होईल पराभव, कसा होईल विजय, किती मताधिक्‍य मिळेल, यावर गावांतील पारांपासून शहरातील बाजारपेठांपर्यंत याच चर्चा झडत आहेत. शिवाय, हौशी कार्यकर्ते पैजा लावत आहेत. निवडणुकीत कॉंग्रेसने सुरेश भोयर यांच्यासाठी सर्वच ताकद पणाला लावली, तर भाजपने टेकचंद सावरकर यांच्यासाठी जोर लावला. यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची बनली आहे. शिवाय, या मतदारसंघातून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने व भाजपकडून टेकचंद सावरकर तसेच कॉंग्रेसने सुरेश भोयर हे दोन्ही नवीन चेहरे दिल्याने हे राज्याच्या राजकीय वर्तुळातही महत्त्वपूर्ण लढत ठरली आहे. विशेष म्हणजे सुरेश भोयर हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते संपूर्ण विधानसभा मतदारसंघात परिचित आहेत. उलट सावरकर हे या क्षेत्रात अनेक ठिकाणी अपरिचित असल्याने त्यांना ही निवडणूक कठीण वाटत असली तरी बावनकुळे यांच्या नावाने मते मागण्यात आली आहेत. याखेरीज सुरेश भोयर हा परिचित चेहरा असून ते माजी आमदार यादवराव भोयर यांचे पुत्र असल्याने यादवराव भोयर यांना मानणारे मतदार सुरेश भोयर यांच्या बाजूने कौल देतील, अशी येथील राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कामठी विधानसभा मतदारसंघात 56.03 टक्‍के मतदान झाले. मतमोजणी होईस्तोवर उमेदवारांचे श्वास अडकून आहेत. कार्यकर्तेही बेचैन आहेत. मतदारांचेही निकालाकडे लक्ष आहे. यंत्रणा मतमोजणीच्या कामाला लागली आहे. सर्वस्तरावर आकडेमोड सुरू आहे. अनेकांचे गणित तयार आहे. सर्वच उमेदवार "जिंकून येणार' असा दावा करीत आहे. नागपूर-कामठी महामार्गावरील खैरी येथील दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये ही मतमोजणी होणार आहे. प्रशासनाकडून सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. जमावबंदीसारख्या आवश्‍यक उपाययोजना केल्या आहेत. मतमोजणीदरम्यान कुणालाही आक्षेप राहू नये, यासाठी प्रशासनाने मतमोजणी केंद्राच्या आतही चोख व्यवस्था केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Latest Marathi News Live Update: मुंबई उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election : ....म्हणून श्रीकांत शिंदेंना लोकसभेत पाठवणे गरजेचे; रामदास आठवलेंचे उल्हासनगरात आवाहन

SCROLL FOR NEXT