yashomati thakur yashomati thakur
विदर्भ

Yashomati Thakur : नाफेड खरेदी बंद केल्यास आक्रमक पवित्रा घेणार; 'शिंदे सरकार बोलत एक आणि करते एक'

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी साधला शिंदे सरकारवर निशाणा..

प्रशिक मकेश्वर.

हे जे ईडी सरकार आहे हे बोलत एक आणि करते एक या सरकारने कुठलाही लेखी आदेश न देताच नाफेड बंद केले त्यामुळे आज शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा माल हा नाफेड मध्ये पडून आहे, हे सरकार कार्यक्रमासाठी पंधरा कोटी रुपये खर्च करतात आणि शेतकऱ्यांसाठी यांच्या जवळ रुपया नाही.

असा निशाणा साधत तिवसा मतदार संघाच्या आमदार व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी रामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरीच्या वतीने तिवसा शहरातील यादव देशमुख महाविद्यालयात आयोजित जॉब महोत्सवाच्या दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलतांना शिंदे सरकारवर टीका केली.

शेतकऱ्यांनी लाखो रुपयाचा माल हा नाफेड मध्ये दाखल केला असतानाच नाफेड खरेदी बंद करणे हा एक प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे,वरिष्ठ अधिकारी फोनवरून सांगतोय की नाफेड खरेदी बंद करा,नेमक यांचे टार्गेट किती आणि आता शेतकऱ्यांनी जवळ असलेला चणा तो कुठे द्याचा हा मोठा प्रश्न सध्या शेतकऱ्यांन समोर उभा आहे,

हे ईडी सरकार आहे हे बोलत एक आणि करता एक,या शिंदे सरकारकडे कार्यक्रमाच्या खर्चासाठी कोटी रुपये आहेत मात्र शेतकऱ्यांसाठी यांच्या जवळ रुपया नाही,हा अन्याय आम्ही का म्हणून सहन करायचा लेखी आदेश न देताच जर नाफेडची खरेदी बंद केल्यास आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेऊ असा इशारा यावेळी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिंदे सरकारला दिला आहे..

जिल्ह्याचे टार्गेट पूर्ण झाले असून पोर्टल कुठल्याही क्षणी बंद पडू शकते, त्यामुळे नाफेडची खरेदी बंद करण्यासंधर्भात वरिष्ठाकडून सूचना मिळाल्या आहेत मात्र लेखी आदेश अजूनपर्यंत नाहीत, शेतकऱ्यांचा माल हा पडून आहे रोज शेतकरी येत आहे त्यामुळे आम्ही टार्गेट वाढवून देण्याची मागणी केली आहे..

-गजानन अळसपुरे, अध्यक्ष खरेदी विक्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

Alegaon Paga Murum Scam: आलेगाव पागा पाझर तलावातील कथित अवैध मुरूम उत्खननाचा ‘खरा हिशोब’ किती? पर्यावरणप्रेमींची वरिष्ठ चौकशी व फेरपंचनाम्याची मागणी

Sillod Farmer: पीक कर्ज, पाण्याअभावी वाळलेले पीक; सिल्लोड तालुक्यात ३० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने जीवन संपवले

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

SCROLL FOR NEXT