Rain Sakal
विदर्भ

Vidarbha Rain Video : विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; घरे पाण्याखाली, पिकांचे नुकसान

दत्ता लवांडे

Vidarbh Rain : अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर मागच्या एका आठवड्यापासून चांगलीच हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. तर विदर्भातील अकोला, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यात संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओढे आणि नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेतमालांचं नुकसान झालं असून अनेक घरात पाणी घुसलं आहे. काही शेतकऱ्यांनी नुकतेच लागवड केलेले पीकही वाहून गेले, त्यामुळे सोयाबीन, कापसाचे नुकसान झाले. त्याचबरोबर कंबरेएवढे पाणी घरात आल्यामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. तर अनेकजण उघड्यावर सामान घेऊन थांबल्याचं दिसत आहे.

दरम्यान, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्यावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं दिसत असून वाहून जाणाऱ्या वस्तू वाचवण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. तर रस्त्या ओलांडण्यासाठी नागरिक मोठ्या दोराचा वापर करत आहेत. घाबरवून टाकणारी ही दृश्ये पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT