Yavatmal Crime 
विदर्भ

Yavatmal Crime : महिलेच्या मारेकर्‍याकडून पोलिस बंदोबस्तात खुनाचे प्रात्यक्षिक; धारदार शस्त्रही जप्त

सकाळ डिजिटल टीम

आर्णी : तालुक्यातील बोरगाव येथे महिलेच्या खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून चोख पोलिस बंदोबस्तात इन कॅमेरा खुनाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. रविवारी (ता.25) प्रात्यक्षिकादरम्यान खुनात वापरण्यात आलेली सुरी, रक्ताने माखलेले कपडे पोलिसांनी जप्त केले.

सुनीता दत्ता मुधळकर (वय 50, रा. बोरगाव) या महिलेच्या घरात प्रवेश करून सुनील प्रकाश जाधव (वय 30, रा. बोरगाव) याने शारीरिक सुखाची मागणी केली. महिलेने त्यासाठी नकार दिल्याने रागाच्या भरात खून केला.

बाबाराव निबोळे (वय 38) याच्या तक्रारीवरून आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मारेकरी घराशेजारी राहणारा सुनील जाधव असल्याचे निष्पन्न झाले.

शनिवारी (ता.24) पांगरी जंगल शिवारातून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता.27) पोलिस कोठडी सुनावली. रविवारी दुपारी साडेतीन वाजता पोलिस बंदोबस्तात मारेकर्‍याला गावात आणण्यात आले. कशाप्रकारे घरात प्रवेश करून खून केला, याचे प्रात्यक्षिक इन कॅमेरा करून घेण्यात आले.

गुन्ह्यात वापरण्यात आलेली धारदार सुरी व रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले. प्रात्यक्षिकादरम्यान ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सुनील पाटील, पोलिस उपनिरीक्षक शिवराज पवार, सतीश चौधार, विशाल गावंडे, योगेश सुकलवार, अशोक टेकाळे, अरविंद चिमटे, अतुल पवार उपस्थित होते.

झोपडीत रात्रभर मुक्कामी

महिलेचा खून केल्यावर सुनील जाधव याने गावात पोलिस येणार या भीतीने पोबारा केला. बोरगावातून पायी कारेगाव पारधी बेडा येथे एका झोपडीत गेला व रात्रभर तेथेच मुक्काम ठोकला. शनिवारी सकाळी शेतशिवारासह जंगल शिवार फिरत निघाला. पिपरी शिवारात गुराखी एकत्र बसून जेवणासाठी थांबतात, तेथे आला. त्यांच्याजवळची भाकर जेवला. त्यानंतर पांगरी दाभडी जंगलातील पांदण रस्त्याने निघाला. याची माहिती जमादार मनोज चव्हाण यांना मिळताच त्यांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT