Crime  sakal media
विदर्भ

यवतमाळ : चोरट्यांचा पारा भडकला अन् साहित्याची केली नासधूस

इतकी मेहनत करुनही हाती काहीच लागले नाही त्यामुळे चोरट्यांचा तिळपापड झाला.

दत्ता लवांडे

नेर (जि. यवतमाळ) : भर दुपारीच चोरटे घरात शिरतात... घराची झाडाझडती घेतात... किचन, बेडरूम, बैठक आदी खोल्यांची बारकाईने तपासणी करतात...मात्र इतकी मेहनत करुनही हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चोरट्यांचा तिळपापड झाला आणि मग काय घरातील सर्व साहित्याची नासधूस करूनच त्यांचे समाधान झाले. नेर शहरातील नूरनगरात बुधवारी (ता.१५) घडलेल्या घटनेने चर्चेला उधाण आले आहे.

नूरनगर येथे प्रा. शेख हुसेन शेख हनीफ (वय ४७) यांचे घर आहे. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांचे उर्वरित कुटुंब अमरावती येथे राहायला गेले आहे. नेहमीप्रमाणे प्राध्यापक शेख हे दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान कॉलेजला गेले असता परिसरातील पाळत ठेवून असलेल्या चोरट्याने गेटचे कुलूप तोडून दुपारी घरात प्रवेश केला. घरातील किचनमध्ये ऐवज ठेवला आहे का ? याची त्यांनी झडती घेतली.

बैठकीतही त्यांनी बारकाईने काही मिळते का याची तपासणी केली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बेडरूमकडे वळवला. बेडरूममधील सर्व कपाटे, दिवाण आदी उघडून बारकाईने पाहणी केली. मात्र, काहीच मिळाले नाही. गलेलठ्ठ पगार असलेल्या प्राध्यापकाच्या घरात आपल्याला नक्कीच मोठा ऐवज हाती लागेल या आशेने घरात शिरलेल्या चोरट्यांची निराशाच झाली. सायंकाळी प्रा. शेख घरी आल्यावर सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. या प्रकरणी नेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, अनोळखी चोरट्यांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT