Crime News 
विदर्भ

Yavatmal Human Trafficking: दारुड्या बापानं पोटच्या तीन वर्षाच्या मुलाला विकलं; 14 तासांतच पोलिसांनी केली सुटका

कतारमधील एका व्यक्तीला हे बाळ सोपवण्यात येणार होतं, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : तीन वर्षीय बाळाची अडीच लाखांत विक्री केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर ठाणेदार केशव ठाकरे यांनी चौदा तासांच्या तपासात पाच आरोपींना शुक्रवारीच (ता.पाच) अटक केली. एका पसार आरोपीच्या मागावर पोलिस आहेत. दरम्यान पोलिसांनी बाल न्याय मंडळ यवतमाळ येथे या बाळाला सुखरूपपणे आईच्या ताब्यात दिले. (Yavatmal human trafficking case drunken father sold his three year old boy within 14 hours police rescued him)

बाळाच्या आईची पोलिसांत तक्रार

तालुक्यातील कोपरा येथील एका २७ वर्षीय महिलेनं आपला दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून आपलं तीन वर्षाचं बाळ नवऱ्याकडं ठेवून देवळी (ता. वर्धा) इथं मोठ्या बहिणीकडे एका महिन्यापूर्वी गेली होती. बहिणीकडे पुष्पाला माहिती मिळाली की, तिच्या बाळाची तिच्या नवऱ्याने परराज्यात विक्री केली. त्यावरून तिने गुरुवारी (ता.चार) आर्णी पोलिसात तक्रार दिली. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी तपासाची चक्र तातडीनं फिरवली

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे वेगाने फिरवित महिलेचा पती त्याचे साथीदार चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या गोडंबे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेलंगणातून अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव बोल्ली गंगाराजू गंगाराम (वय ४५, रा. मोहनराव पेठ, ता. कोर्टुला, जि. जगतीयाल) असं आहे. या शिवाय या प्रकरणात मुलाच्या बापासह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार केशव ठाकरे, जमादार मनोज चव्हाण, आकाश गावंडे, जया काळे यांनी पार पाडली. पुढील तपास सुरू आहे.

रातोरात बाळ आर्णीकडं

आदिलाबाद येथे अडीच लाखांत मुलाची विक्री केल्याचे कळलं. आदिलाबाद येथील एजंट अरविंद उस्केमवार याला ताब्यात घेऊन बाळासंबंधित चौकशी केली असता ते बाळ तेलंगणा राज्यात एका महिलेकडं असल्याचं सांगण्यात आलं. पोलिसांनी त्या ठिकाणी पोहचून मोबाईलच्या लोकेशनच्या आधारे संबंधित महिलेला ताब्यात घेऊन बाळालाही आपल्याकडे घेतलं आणि रातोरात पुन्हा आर्णीकडं निघाले. (Latest Marathi News)

कतारमध्ये होणार होती विक्री

तेलंगाणात ज्या महिलेकडून पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतलं. ती महिला या बाळाला मूळ कतार इथं राहणाऱ्या एका व्यक्तीला विकणार होती, प्राथमिक तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT