shivajirao moghe sakal
विदर्भ

Shivajirao Moghe : कर्नाटक निवडणुकीत आदिवासी जनता काँग्रेसच्या मागे; काँग्रेसचे १५ आदिवासी उमेदवार विजयी

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून पूर्ण बहुमत मिळवीत भ्रस्टाचारी व समाजात फूट पडणाऱ्या भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून पूर्ण बहुमत मिळवीत भ्रस्टाचारी व समाजात फूट पडणाऱ्या भाजपचा दणदणीत पराभव केला आहे.

यवतमाळ - कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून पूर्ण बहुमत मिळवीत भ्रस्टाचारी व समाजात फूट पडणाऱ्या भाजपचा दणदणीत पराभव केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे आदिवासी १५ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले असून, पुन्हा एकदा आदिवासी समाज ठामपणे काँग्रेसमागे उभा असल्याचे दिसत असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय आदिवासी सेलके अध्यक्ष शिवाजीराव मोघे यांनी सांगितले.

आदिवासीसाठी राखीव असलेल्या १५ विधानसभा मतदारसंघापैकी १४ ठिकाणी काँग्रेस उमेदवार विजयी झाले असून, एका खुल्या जागेवर काँग्रेसचा आदिवासी उमेदवार विजयी झाला असल्याचे मोघे म्हणाले. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जून खर्गे याना या विजयाचे श्रेय आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान २२ दिवसापेक्षा जास्त दिवस कर्नाटकमध्ये दौरा केला होता. त्यावेळी त्यांना जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला. दुसरीकडे सत्तारूढ भाजपचे नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याची टिंगल उडवत होते. आज मात्र प्रचंड पराभव झाल्यावर भाजपचे नेते हादरले असल्याचे मोघे म्हणाले. काँग्रेसच्या राष्ट्रीय आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाची जबाबदारी राहुल गांधी यांनी सोपविल्यावर देशभरात जाण्याची संधी मिळाली.

निवडणुकीच्या निमित्याने कर्नाटकातील आदिवासींसाठी राखीव असलेल्या मतदार संघात प्रचाराची संधी मिळाली. त्यावेळी काँग्रेसमागे आदिवासी समाज ठामपणे उभा असून भाजपबद्दल त्यांच्यामध्ये कमालीची चीड दिसत होती, असे मोघे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT