bhawana gawali sakal
विदर्भ

Railway Route : वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाच्या कामाला गती

यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग नागपूर-तुळजापूरचे काम पूर्ण करून यवतमाळ जिल्हा विकासाच्या नकाशावर आणला आहे. ही दोन्ही कामे यवतमाळ शहराची कनेक्टिव्हिटी वाढविणारी असल्याने भविष्यात यवतमाळात उद्योगधंदे येतील असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. या काळात वर्धा-नांदेड रेल्वेला खर्‍या अर्थांने गती मिळाली. विद्यमान खासदार भावना गवळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री व रेल्वेमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून वर्धा-नांदेड रेल्वेच्या कामाला गती दिली आहे. तर, नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गामुळे यवतमाळच्या विकासाला गती मिळाली आहे.

यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी पाच टर्म प्रतिनिधित्व केले. गेल्या नऊ वर्षांचा विचार केला तर रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग हीच विकासाची प्रमुख कामे झालेली आहेत. खासदार गवळी या शिवसेनेच्या असतानाही त्यांनी अनेक कामे केली आहेत. आता तर त्या भाजपसोबत घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) पक्षात आहेत.

येत्या लोकसभेसाठीही त्यांची दावेदारी आहे. मतदारसंघाचा विचार करता त्यांनी शंकुतला ब्रॉडगेज रेल्वेसाठी प्रयत्न केले. निक्सन कंपनीला 32 कोटी देऊन शंकुतला रेल्वे भारताच्या ताब्यात घेतली. पिकविम्याला वाचा फोडली. शेतकर्‍यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी मोठे आंदोलन केले. यवतमाळला मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीसाठी 120 कोटी मिळविले.

महिलांसाठी कॉटन हातमाग क्लस्टर तयार केले. पासपोर्ट ऑफिस यवतमाळात सुरू केले. जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील 50 टक्के गावांना पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली आहे. परंतु, यवतमाळच्या विमानतळाचा प्रश्‍न अद्यापही मार्गी लागला नाही. यवतमाळात त्यांच्या 25 वर्षांच्या काळात एकही उद्योग आला नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्‍न सुटला नाही. शैक्षणिकदृष्ट्या शहराचा विकास झाला नाही. आरोग्याच्या सुविधाही येथे वाढल्या नाहीत.

मतदारसंघाचा विकास करताना त्यांनी वाशीम व कारंजा या दोन विधानसभांकडे विशेष लक्ष दिले. त्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्षच झाले असा आरोप नागरिकांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT