Yavatmal Crime News Sakal
विदर्भ

Yavatmal Crime News: पूर्व वैमनस्यातून वाढदिवसापूर्वीच तरुणाचा खून

पूर्व वैमनस्यातून वाढदिवसापूर्वीच तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (ता. १६) रात्री साडेआठ वाजता दरम्यान कळंब येथील इंदिरा चौकात घडली.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - पूर्व वैमनस्यातून वाढदिवसापूर्वीच तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना सोमवारी(ता.१६) रात्री साडेआठ वाजता दरम्यान कळंब येथील इंदिरा चौकात घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सलग खुनाची मालिका सुरू असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

अश्विन राऊत (वय २३,रा. हलबीपुरा, कळंब)असे मृताचे नाव आहे. तरुण कळंब येथील इंदिरा चौकात उभा असताना दोन दुचाकीवरून चार अनोळखी व्यक्ती तेथे आले. त्यांनी तरुणाच्या डोक्यावर हातोडीने हल्ला केला. त्यानंतर चाकूने पोटात सपासप वार केले.

त्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. चारही जण दुचाकी सोडून फरार झाले. तरुणाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच एसडीपीओ संपत भोसले, ठाणेदार अजित राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. वृत्तलीहेस्तो वर गुन्हा नोंद झाला नव्हता.

अश्विनचा मंगळवारी(ता.१७) वाढदिवस होता. मात्र त्यापूर्वीच त्याचा गेम करण्यात आला. मारेकरी कोण आहेत, हे कळू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT