crime (2).jpg 
विदर्भ

लग्न लावून देतो म्हणतं यवतमाळच्या तरुणीला बोलावले बुलडाण्यात अन् घडले असे...

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर (जि.बुलडाणा) : यवतमाळ येथील तरुणीला बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे बोलावून एका युवकासोबत लग्न लावून दिले व देवदर्शनाचे कारण सांगत पूर्णा नदीच्या पुलासमोर गाडी थांबवून तेथील झुडपात तरुणीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी दोघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

येथील भास्कर इंगळे याने वणी तालुका यवतमाळ येथील 18 वर्षीय तरुणीला मोबाईलवर फोन करून मलकापूर येथे ये मी तुझे लग्न एकनाथ पारस्कर (रा.ओमकार लॉन, निंबारी फाटा) याचे सोबत लावून देतो, असे म्हणून त्या तरुणीला मलकापूरला बोलविले व 22 मार्च 2020 रोजी तरुणीचे एकनाथ पारस्कर सोबत लग्न लावून दिले. 24 मार्च रोजी भास्कर इंगळे, एकनाथ पारस्कर या दोघांनी त्या तरुणीस मोटार सायकलवर ट्रिपल सिट बसवून धुपेश्वर येथे देवदर्शनासाठी नेले.

दिली जिवे मारण्याची धमकी
मात्र, मंदिर बंद असल्याने बाहेरून दर्शन घेत पूर्णा नदीवरील पुलाच्या समोर जात पारस्कर याने दुचाकी गाडी थांबवून तिला ओढत झुडपात नेवून दोघांनी तिच्यावर जबरीने अत्याचार केला. कोणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी भास्कर इंगळे, एकनाथ पारस्कर रा.ओमकार लॉन, निंबारी फाटा (मलकापूर) यांचे विरुध्द कलम 376 (1), 506, 34 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT