akola washim gazetier.jpg 
विदर्भ

1910 साली दहा हजार भाविकांचा उल्लेख; मात्र आता...

सकाळ वृत्तसेवा

डोंगरकिन्ही (जि.वाशीम) : नागरतासला शेकडो वर्षांपासून चैत्रनवमीला मोठा यात्रोत्सव होतो. 1910 सालच्या अकोला-वाशीम जिल्हा गॅझेटीयर्समध्ये याचा उल्लेख आलेला आहे. मात्र, शेकडो वर्षांत प्रथमच कोरोना या साथरोगामुळे चैत्रनवमी उत्सवाला भाविकांची मांदीयाळी नसल्याचे दिसून आले.

मुंबई ते औरंगाबाद ह्या राज्य महामार्गालगतच शेकडो वर्षांपासून जगदंबा देवी संस्थान आहे. या देवीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. शेकडो वर्षे झाले येथे भवानी मातेचा चैत्रनवमी उत्सव व हिवाळ्यारंभी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. पूर्वी वाशीम जिल्हा होता. त्यानंतर अकोला व वाशीम मिळून संयूक्त अकोला जिल्हा नवनिर्मिती करण्यात आली. यावेळी 1910 मध्ये इंग्रज काळात अकोला जिल्हा गॅॅझेटीयर्स काढण्यात आले. त्यामध्ये यात्रांच्या रकाण्यात हा गौरवोल्लेख आला आहे. 

विशेष म्हणजे मालेगाव तालुक्‍यातील चैत्रनवमीचा सर्वांत मोठा उत्सव नागरतासच्या जगदंबामाता संस्थानवर सध्याही चालू आहे. नऊ दिवस विविध धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे नवरात्रोत्सवाप्रमाणे चैत्रनवमी महोत्सवालाही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी अते. मात्र, शेकडो वर्षांत प्रथमच चैत्रनवमीला कोरोना या संसर्गजन्य साथरोगामुळे या उत्सवाला भाविकांची उपस्थिती राहिली नाही. शासनाने सूचलिलेल्या नियमांच्या आधीन राहून पुजाऱ्यांनी विधीवत पूजा केल्याची माहिती आहे.

काय उल्लेख आहे गॅझेटीयर्समध्ये?
वाशीम तालुक्‍यात दहा हजार लोकांनी सांगीतले की, ते आसरा पार्डी येथील आसरा माता व नागरतासला उन्हाळ्यारंभी होणाऱ्या भवानी माता व देवींच्या यात्रोत्सवास उपस्थितीत दर्शवित असल्याची माहिती आहे. तसेच याच गॅझेटीयर्समध्ये वाशीम तालुक्‍यातील विस्तीर्ण माहिती विशद करताना नागरतासच्या यात्रोत्सवाला चार ते 10 हजारापर्यंत लोकांची मांदीयाळी असते. अशा आशयाची माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT