A young farmer from Mozari erected an LED light fence around the field 
विदर्भ

रात्रीच्या अंधारात लाइटच्या झगमगाटाने चकाकते शेत; पिकांच्या संरक्षणासाठी अनोखी शक्कल

संदीप राऊत

मोझरी (जि. अमरावती) : सध्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने युवकांच्या कल्पक बुद्धिमत्तेतून नवनवीन स्टार्टअप उदयास येताना दिसत आहे. परंतु, कुठल्याही कार्यशाळेत तांत्रिक शिक्षण न घेता निव्वळ इच्छाशक्तीच्या जोरावर मोझरी येथील युवा शेतकऱ्याने वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी एक नवीच शक्कल शोधून काढली. त्याने संपूर्ण शेताभोवती कुंपणाला एलईडी लाइट लावले. विशेष म्हणजे त्याची ही शक्कल यशस्वीही झाली आहे. या युवकाचे नाव शहजाद रज्जाक शेख असून तो मोझरी येथील रहिवासी आहे.

शहजाद रज्जाक शेख याने दोन एकर शेतात हरभऱ्याची लागवड केली. यावेळी पहिल्यांदाच समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा आहे. परंतु वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे रात्रंदिवस शेताचे रक्षण करूनही नुकसान टाळता येत नव्हते. यापूर्वी वन्यप्राण्यांनी कपाशी व मका पिकाचे अतोनात नुकसान केले. त्यामुळे काहीही झाले तरी चालेल, पण वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार शहजादने केला.

त्याने संपूर्ण शेताभोवती एलईडी लाईटचे कुंपणच घातले आणि विशेष म्हणजे तेही अतिशय कमी खर्चात. कौतुकाची बाब म्हणजे त्याचा हा अनोखा प्रयोग यशस्वीही झाला. या प्रयोगामुळे वन्यप्राण्यांचा त्रास आटोक्‍यात आला असून रात्रीच्या अंधारात लाइटच्या झगमगाटाने चकाकणारे शेत पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी कुतुहलाने हजेरी लावताना दिसून येत आहेत. 

स्वस्त व सुरक्षित उपाय

शेतात वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. वन्यप्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अनेकजण शेताच्या तारेच्या कुंपणात वीजप्रवाह सोडतात. परंतु यात वन्यप्राण्यांसह मणुष्यहानी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तेव्हा एलईडी लाइटचे कुंपण अत्यंत सुरक्षित असून हा प्रयोग शंभर टक्‍के साध्य झाला आहे. रेजिस्टन्स, वायर व बॅटरीच्या साहाय्याने हे कुंपण तयार केले असून यासाठी प्रती एकर पाचशे ते सहाशे रुपये खर्च येतो, अशी माहिती शहजाद शेख याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT