विदर्भ

अवघ्या अर्धा एकर शेतीत घेतलं तब्बल ८० क्विंटल कांद्याचं उत्पन्न

विवेक राऊत

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : शेती व्यवसाय (Traditional Farming) हा एकप्रकारचा जुगारच असल्याचे नेहमी बोलल्या जाते. कधी दुष्काळ तर कधी भक्कम पीक. परंतु अथक परिश्रम आणि निसर्गाची साथ मिळाल्यास शेतकरी चांगले उत्पन्न घेऊ शकतो. याचा प्रत्यय तालुक्‍यातील सुपलवाडा येथील युवा शेतकऱ्याला आला. त्याने आपल्या अर्ध्या एकरात तब्बल 80 क्विंटल कांद्याचे उत्पन्न घेतले. (Young farmer took 80 quintal onions in half Acre)

प्रवीण विनायक ठाकरे, असे त्या युवा शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्याकडे तीन एकर ओलिताची शेती आहे. शिक्षण घेऊनही नोकरी न मिळाल्याने त्यांनी शेतीकडे आपले लक्ष वळविले. तीन एकरातील सव्वा एकरात संत्रा, अर्ध्या एकरात कापूस आणि इतर क्षेत्रात मिरची, हरभरा आदी पिकांची लागवड मागील वर्षी केली होती. परंतु पाहिजे त्याप्रमाणात कापसाचे पीक होत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पऱ्हाटी उपटून त्याठिकाणी कांद्याची लागवड केली.

शास्त्रशुद्ध पद्धतीने कांद्याचे बियाणे घेऊन त्यावर मेहनत घेतली, त्यात यश येत तब्बल अर्ध्या एकराच्या जागेत त्यांना 80 क्विंटल कांद्याचे उत्पन्न झाले. कांद्याच्या संपूर्ण लागवडीचा आणि काढण्यापर्यंतचा खर्च 30 हजार आल्याचे त्यांनी सांगितले. कांद्याला निवडून थोडाफार विकला, त्याचे 55 हजार रुपये त्यांना मिळाले, तर उर्वरित कांदा स्वच्छ करीत आपण भरून ठेवल्याचे त्यांनी सांगितले. आपला कांदा हा अनेक दिवस साठवून ठेऊ शकतो, तो खराब होणार नाही, याची त्यांना खात्री आहे.

मागील काळाप्रमाणे आता कांदा 10 रुपयांच्या खाली जाणार नाही. येणाऱ्या काळात कांदा आणखी महाग होणार म्हणून आपण त्याची साठवणूक केली असल्याचेही त्यांनी सांगितले. भाव चांगले मिळाल्यास किमान दोन लाखांचे उत्पन्न आपल्याला कांद्यापासून मिळू शकते, असे प्रवीण ठाकरे यांनी सांगितले.

कापसाने मारले, कांद्याने तारले

कापूस पिकाकडून आपल्याला खूप अपेक्षा होती म्हणून कापसाची लागवड केली, पण बोंडअळीने कापसाचे उत्पन्न घटविले. त्यामुळे वेळीच निर्णय घेत कापूस उपटून कांदा लावला. कापसाने मारले असले तरी कांद्याने तारले, अशी प्रतिक्रिया प्रवीण ठाकरे या युवा शेतकऱ्याने दिली.

(Young farmer took 80 quintal onions in half Acre)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT