Young Farmers end his Life in Amravati district
Young Farmers end his Life in Amravati district  
विदर्भ

तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या; नापिकी आणि आर्थिक संकटामुळे संपवलं जीवन 

प्रशिक मकेश्वर.

तिवसा (जि. अमरावती) :  तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे आज सकाळच्या सुमारास एका तरुण विवाहित शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे संदीप दादाराव कुरळकर वय ३६वर्ष असे या शेतकऱ्याचे नाव असून तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथील रहिवासी आहेत.

आपल्या दोन एकराच्या शेतीत उत्पन्न घेत परिवाराचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुण विवाहित शेतकऱ्यांने नापिकी व आर्थिक संकटाच्या विवंचनेतुन टोकाचं पाऊल उचलत गावातील स्मशानभूमी लगत असलेल्या पुलावर विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली, या घटनेमुळे गावात शौककाळ पसरली आहे जिल्हा रुग्णालयात त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदान करण्यात आले असून गावातील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला,

कुरळकर यांच्याकडे दोन एकर शेती असून यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होता मात्र आता घरातील कर्ता व्यक्तीच गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात एक 4वर्षाचे, दोन वर्षाचे मुलं व पत्नी,आई असा परिवार असून त्यांचा पुढे उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT