YIN
YIN 
विदर्भ

यूथ इन्स्पिरेटर्स ‘अवॉर्ड’

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - अडथळ्यांवर मात करून समाज व देशासाठी रचनात्मक काम करणाऱ्या तरुणांचा डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनचे ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) युवा व्यासपीठ ‘यूथ इन्स्पिरेटर्स अवॉर्ड- २०१९’ देऊन गौरव करणार आहे. सात विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या युवकांचे कौतुक व्हावे व इतर युवकांसाठी यातून प्रेरणा मिळावी, या हेतूने हे पुरस्कार दिले जाणार आहेत. 

शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, यासाठी ‘यिन’ने महाविद्यालयीन तरुणांसाठी आयोजित केलेल्या ‘यिन समर यूथ समिट’च्या निमित्ताने हे गौरव होणार आहेत. संपूर्ण विदर्भासाठी १२ व १३ जून ला ही परिषद रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे होणार आहेत. प्रत्येक विभागात ही पारितोषिके देण्यात येणार आहेत. कम्युनिटी सर्व्हिस, सामाजिक सेवा, कला आणि सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी, एक्‍सलन्स इन यूथ लीडरशिप आणि उद्योग-स्टार्ट अप क्षेत्रांसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. या पुरस्कारांसाठी नामांकने मागवण्यात येत आहेत. सात  क्षेत्रांमधील १८ ते ३० वयोगटांतील युवक-युवती या पुरस्कारांसाठी ९ जूनपर्यंत अर्ज करू शकतात. ‘यिन समर यूथ समिट’मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती व तज्ज्ञांना भेटायची, तसेच विविध कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रांमध्येही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT