file photo 
विदर्भ

महिला अधिकाऱ्यास अडवून विनयभंग; ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

संतोष ताकपिरे

अमरावती : औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यास अडवून तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. माझ्यासोबत बोल नं, अशी मागणी युवकाने तिच्यापुढे रेटून धरली. त्या युवकाविरुद्ध राजापेठ ठाण्यात विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

अमित देविदास पाडवे (वय ३५, रा. आर्वी, जि. वर्धा), असे पाठलाग करून विनयभंग करणाऱ्याचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित युवती नोकरी करीत असलेल्या ठिकाणी अमितचे येणे-जाणे असल्यामुळे त्यांची ओळख झाली. अमितने युवतीचा मोबाईल नंबर मिळविला.

मागील सहा महिन्यांपासून सतत पीडितेच्या मोबाईलवर संपर्क साधून सोबत बोलण्याची आग्रही मागणी करीत होता. पीडितेने अमितच्या वर्तणुकीकडे दुर्लक्ष केल्यानंतर ती खूप आवडत असल्याचे सांगून टाकले. सतत बोलत जा, असा आग्रह धरलेल्या अमितला युवतीने समज दिल्यानंतरही त्याच्या वागणुकीत फरक पडला नाही.

युवतीने टाळले त्याला

त्यामुळे युवतीने मोबाईलवर उत्तर देण्याचे टाळले. परंतु मनात घर करून बसलेल्या युवतीसोबत काही झाले तरी संपर्क करायचाच म्हणून त्याने संपर्कासाठी दुसऱ्याही फोनचा वापर केला. अमितकडे दुर्लक्ष करीत असतानाही तो ती राहत असलेल्या ठिकाणीसुद्धा पोहोचला. पुन्हा दोन मिनिटे तरी बोल, असा आग्रह त्याने पीडितेपुढे धरला.

पीडितेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न

पीडितेशी त्याने जवळिक साधण्याचा प्रयत्न केला. फोन न उचलता दुर्लक्ष का करते? असा प्रश्‍न अमितने युवतीपुढे उपस्थित केला. अखेर त्याने बोलण्याचे टाळल्यास स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करून घेईन, अशी धमकी तिला दिली. पीडितेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी अमित पाडवेविरुद्ध गुन्हा दाखल केला. अमितला सोमवारपर्यंत (ता. सात) अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

(संपादन  : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सप्तपदी, सात वचनं... पण अवघ्या १६८ तासांतच नात्याचा झाला शेवट; जोडप्यानं का घेतला वेगळं होण्याचा निर्णय?

IND vs SL: भारतीय संघाला मोठा धक्का! कसोटी मालिकेतून जसप्रीत बुमराह बाहेर, कोण घेणार त्याची जागा?

Latest Marathi News Live Update : मुंबईला अनेक दशकांपासून वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्यांचा सामना करावा लागला - पीयूष गोयल

Police Station Chaos: मित्राला सोडवण्यासाठी सहकारनगर पोलिस ठाण्यात गोंधळ, तोडफोड व पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी; तरुण अटकेत

Youth Empowerment: युवकांनी स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळा : महादेव जानकरांचा संदेश

SCROLL FOR NEXT