young man committed suicide because he did not want to be Son-in-law who stays at wifes home  
विदर्भ

Gadchiroli News : प्रेमाचा हृदयद्रावक अंत! घर जावई व्हायचं नव्हतं म्हणून तरुणानं संपवलं जीवन

घरजावई होऊन शिवटोल्याला जाण्याच्या आदल्या दिवशी रविवारी सुधाकर पोटावीने आपल्या शेतातून आंबे आणून घरी दिले....

सकाळ वृत्तसेवा

धानोरा (जि. गडचिरोली),ता.१० : धानोरा तालुक्यातील तोयागोंधी येथे एक विचित्र घटना घडली असून घरजावई व्हायची इच्छा नसल्याने एका युवकाने विष प्राशन करून जीवन संपल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधाकर महारू पोटावी (वय २५) असे मृत युवकाचे नाव असून त्याने रविवार (ता. ९) दुपारी टोकाचे पाऊल उचलले.

प्राप्त माहितीनुसार मृत सुधाकर पोटावीचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. पण तो घर जावई बनून आला, तरच लग्न होईल, असा प्रस्ताव मुलीच्या घरच्यांकडून आला होता. त्यानुसार सुधाकरला त्याचे कुटुंबीय घरजावई म्हणून सुरसुंडी गावाजवळच्या शिवटोला येथे नेऊन देणार होते. परंतु त्याला घरजावई होणे पसंत नव्हते.

घरजावई होऊन शिवटोल्याला जाण्याच्या आदल्या दिवशी रविवारी सुधाकर पोटावीने आपल्या शेतातून आंबे आणून घरी दिले. त्यानंतर दुपारी तो पुन्हा शेतामध्ये निघून गेला. सायंकाळी तोयागोंदी येथे वादळी पाऊस आल्याने सर्व लोक घरी आले. मात्र सायंकाळ झाली, तरी सुधाकर घरी आला नाही म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी कुटुंबातील सदस्य शेतात गेले असता तो शेतात मृतावस्थेत आढळून आला. त्याला धानोरा ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांला मृत घोषीत केले. त्यानंतर सोमवार (ता. १०) सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह घरच्यांना सोपाविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg Sahyadri : जंगलांची कत्तल सुरूच! सह्याद्रीतील वनक्षेत्र घटल्याने जैवविविधतेचा गंभीर इशारा

Pranita Kulkarni: मतदानाला गेला नाहीस तर पैसे का घेतले? भाजप नगरसेविकेचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी,इस्लाम पार्टी,समाजवादीची युती

New Year Party Dress: न्यू इयर पार्टीत सर्वांपेक्षा वेगळं दिसायचंय? ट्राय करा हे स्टायलिश बॉडीकॉन ड्रेस!

Nagpur Municipal Election : युतीत शिंदेसेनेला हव्यात २२ जागा; शिवसेनेच्या नेत्यांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT